Tarun Bharat

रेईश मागुश किल्ला ठरणार पर्यटन केंद्रबिंदू !

पुरातत्वमंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती मिरामार ते किल्ल्यापर्यंत रोप वे उभारणार

प्रतिनिधी /म्हापसा

रेईश मागूश किल्ल्यावर चित्रपट चित्रीकरणासाठी आवश्यक असलेल्या साधनसुविधा मार्गी लावण्यात येणार असून त्यामुळे सरकारी तिजोरीत पैसाही येईल आणि पर्यटनदृष्टय़ाही फायदा होईल. याठिकाणी रोप वे सुरु झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात पर्यटकांचा ओघ वाढून हा किल्ला गोव्याच्या पर्यटनदृष्टय़ा केंद्रबिंदू ठरणार असल्याची माहिती पुराभिलेख व पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल बुधवारी किल्ल्याला अधिकारीवर्गासमवेत भेट देऊन पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

 मंत्री फळदेसाई यांनी येथील सर्व समस्या जाणून घेतल्या. तसेच येथील अधिकारीवर्गाशी चर्चा केली. तेथे काही बदल तसेच काही सुधारणा करण्याबाबत चर्चा केली. यावेळी साळगाव मतदारसंघाचे आमदार केदार नाईक तसेच अधिकारी उपस्थित होते.

पोर्तुगीज काळात या किल्ल्याचा स्वातंत्र्यसैनिकांना डांबण्यासाठी कारागृह म्हणून वापर करण्यात येत होता. अन्न सामुग्रीसाठीही या किल्ल्याचा वापर होत होता. समुद्राच्याजवळील टेकडीवर हा किल्ला उभा आहे. आता नवीन पिढीसाठी किल्ला प्रेक्षणीय तसेस उपयुक्त ठरणार आहे. पर्यटन हंगामामध्ये या ठिकाणी रोज 300 ते 500 पर्यटक भेट देतात, असेही ते म्हणाले.

उत्कृष्ट साधनसुविधा निर्माण करणार

पर्यटन खात्याकडे चर्चा करून येथे रोप वे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे पर्यटकांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. त्यादृष्टीकोनातून सरकार येथे उत्कृष्ट दर्जाच्या सर्व पायाभूत सेवा देणार आहे. बार्देश तालुक्यातून मंत्री तुमच्या दारी या सरकारच्या संकल्पनेतून आपण आज या किल्ल्याला भेट दिली आहे. पुराभिलेख खाते आपल्याकडे आहे. येथे अभ्यास करून पर्यटकांना आकर्षक सुविधा देण्याचा प्रयत्न असून त्यास भाजपा सरकार कटिबद्ध असल्याचे फळदेसाई म्हणाले.

Related Stories

गोमंतकातील लोकसंस्कृती ही विविध संकल्पनांनी वैशिष्टपूर्ण आहे : ज्योती कुंकळकार

Amit Kulkarni

खाण लीज नूतनीकरण सीबीआयकडे सोपवा

Patil_p

गिरी येथे शिवनाथ स्वामीची 18 रोजी पुण्यतिथी

Amit Kulkarni

तंत्रज्ञानाचा आविष्कार आजपासून लोकसेवेत

Amit Kulkarni

कुमेरीच्या सनदा 30 दिवसांत न दिल्यास न्यायालयात जाऊ

Amit Kulkarni

फोंडा-पणजी महामार्गावर झाड कोसळले

Amit Kulkarni