नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरील संवेदनशील प्रश्नावर सरकार चर्चेला परवानगी देत नसल्याचा आरोप करत कॉग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. प्रश्नोत्तराचा तास संपताच काँग्रेसचे सभागृह नेते अधीर रंजन चौधरी यांनी “भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चा व्हावी” अशी मागणी केली.
यावेळी बोलताना अधिररंजन चौधरी म्हणाले, “आम्ही भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चेची मागणी करत आहोत. 1962च्या भारत-चीन युद्धानंतर जवाहरलाल नेहरूंनी याच सभागृहात 165 खासदारांना बोलण्याची संधी दिली होती. आणि या युद्धाच्या प्रश्नावर काय करायचे यावर निर्णय घेण्यात आला होता.” असे खासदार चौधरी म्हणाले. काँग्रेसच्या या मागणीला उत्तर देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीत या प्रश्नावर निर्णय घेतला जाईल.


next post