बेळगाव : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील पाच कैद्यांची सुटका करण्यात आली. कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कैद्यांची सुटका करण्यात आली. तर कारागृहाच्या आतील बाजूला झालेल्या कार्यक्रमात महिला कैद्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी औद्योगिक सुरक्षा विभागाच्या पथकाचे पथसंचलन झाले. विविध स्पर्धेतील विजेत्या कैद्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कारागृहात प्रजासत्ताक दिनानिमित्त गोड वाटप करण्यात आले.
यावेळी चार पुरुष व एक महिला अशा पाच कैद्यांची सुटका करण्यात आली. केंद्र सरकारच्या मार्गसुचीनुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यात पाच कैद्यांना त्यांची उर्वरित शिक्षा माफ करून सुटका करण्यात आली. यावेळी कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश नागरबेट्टा, प्रशासकीय अधिकारी बी. एस. पुजारी, साहाय्यक अधीक्षक शहाबुद्दीन के., पीएसआय अरुण डी. व्ही., जेलर वाय. एस. नायक, अभिषेक, बजंत्री, शशिकांत यादगुडे आदी उपस्थित होते.