Tarun Bharat

हातकणंगले पंचायत समितीच्या 24 गणांसाठीचे आरक्षण सोडत जाहीर

Advertisements

हातकणंगले / प्रतिनिधी

हातकणंगले पंचायत समितीच्या 24 गणांसाठीचे आरक्षण सोडत गुरुवारी तहसीलदार कार्यालय, हातकणंगले येथे संपन्न झाली. या आरक्षण सोडतीस नागरिकांनी अल्प प्रमाणात प्रतिसाद दिला. काही मोजक्याच लोकांनी या आरक्षणात भाग घेतला. या सोडतीवेळी नागरिकांपेक्षा कर्मचाऱ्यांची संख्या हॉलमध्ये अधिक दिसत होती. लहान मुलाकडून आरक्षणाच्या चिठ्ठ्या उचलून ही सोडत करण्यात आली.

या सोडतीनुसार अनुसूचित जातीसाठी 4 जागा राखीव ठेवण्यात आल्या. यामध्ये 2 महिला व 2 अनुसूचित जाती सदस्य सर्वसाधारण राखीव ठेवण्यात आले. अनुसूचित जाती महीलांमध्ये आळते व शिरोली दक्षिण गण आरक्षित राहिले, तर अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी रेंदाळ पूर्व व साजणी गण निश्चित करण्यात आले.

तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 6 जागा आरक्षित करण्यात आल्या. यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी वाठार तर्फे वडगाव नरंदे, कोरोची हे तीन गण राखीव ठेवण्यात आले. तर नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण साठी नवे पारगाव भादोले, चंदुर हे गण आरक्षित करण्यात आले, तसेच 14 गण हे सर्वसाधारण साठी निश्चित करण्यात आले. यामधील 7 गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आले. हेरले, रुकडी, कबनुर पूर्व, कबनुर, पश्चिम माणगाव, शिरोली उत्तर, हे महिलांसाठी सर्वसाधारण गण राखीव करण्यात आले. तसेच सर्वसाधारण गणांमध्ये घुणकी, सावर्डे, तारदाळ, पट्टणकोडोली पूर्व, पट्टणकोडोली पश्चिम, रेंदाळ पश्चिम, कुंभोज यांचा समावेश करण्यात आला.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे, अप्पर तहसीलदार शरद पाटील इचलकरंजी निवासी नायब तहसीलदार दिगंबर सानप, यांच्या उपस्थितीत सर्व आरक्षण निश्चित करण्यात आली

Related Stories

किटवाड-ढोलगरवाडी रस्त्याचे काम दर्जाहीन

Abhijeet Shinde

मायक्रो फायनान्स कंपनीच्या दमदाटी विरोधात महिलांचा मोर्चा

Abhijeet Shinde

हायमास्ट पथदिव्यांसाठी विजपुरवठा करा, अन्यथा उपोषण : जि.प.सदस्या मनिषा कुरणे

Abhijeet Shinde

ऐन पावसाळ्यात पाचगावकरांचा पाण्यासाठी रास्ता रोको

Abhijeet Shinde

कोल्हापूर : तिघा चोरट्यांना अटक, अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Shinde

कोल्हापूर : तारीख तीच.. वारही तोच… फक्त वर्ष बदलले !

Abhijeet Shinde
error: Content is protected !!