देशभरातील मिठाई ग्राहकांना चाखता येणार ः सप्टेंबरच्या तिमाहीत जियोने 77 लाख ग्राहक जोडले
वृत्तसंस्था/ मुंबई
रिलायन्स रिटेलच्या नफ्यामध्ये सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये 51 टक्के इतकी वाढ दिसली आहे. जुलै-सप्टेंबर कालावधीतील निव्वळ नफा 4 हजार 404 कोटी रुपयांचा राहिला आहे. गेल्या काही कालावधीमध्ये कंपनीच्या शोरुम्सची संख्या वाढली असल्याने त्याच अनुषंगाने ग्राहकांची संख्याही वाढल्याने वरील नफा कंपनीला प्राप्त करता आला आहे.
दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणाऱया रिलायन्स जिओनेही दमदार कामगिरी सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीमध्ये नोंदविली आहे.
रिलायन्स जिओने जुलै ते सप्टेंबर या कालावधीत 4 हजार 518 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. एप्रिल ते जून तिमाहीच्या तुलनेमध्ये यावेळेचा नफा 4 टक्के अधिक आहे. याच कालावधीतला कंपनीचा महसूल 22 हजार 521 कोटी रुपयांचा राहिला आहे. जून तिमाहीमध्ये 21 हजार 873 कोटींचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता. याच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीत महसूल 3 टक्के वाढला आहे.
तेल आणि गॅस व्यवसायानेही कंपनीला 15 हजार 515 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवून दिला आहे. तर दुसरीकडे सप्टेंबर तिमाहीत 57 टक्के वाढीसह 86 हजार 382 कोटी रुपयांची निर्यात रिलायन्सकडून करण्यात आली आहे. सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये रिलायन्स जिओने 77 लाख इतके नेट ग्राहक जोडले असून 30 सप्टेंबर 2022 पर्यंत यांची एकूण ग्राहक संख्या 42 कोटी 76 लाखांवर पोहोचली आहे. जिओ नेटवर्कचा वापर करणाऱया ग्राहकांनी प्रतिमहिन्याला सरासरी 22.2 जीबीचा वापर केला असल्याचेही दिसून आले
आहे.
रिलायन्स वित्तसेवा स्वतंत्र करणार
याच दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपली कंपनीची वित्तीय सेवा स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’ या अंतर्गत आगामी काळामध्ये वित्तसेवा ग्राहकांसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून उपलब्ध केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
रिलायन्स रिटेलमध्ये मिळणार देशभरातील मिठाई
रिलायन्स इंडस्ट्रीजकडून त्यांच्या ग्राहकांना खास भेट मिळणार आहे. येणाऱया कालावधीमध्ये रिलायन्स रिटेल शोरुममध्ये देशभरातील प्रसिद्ध मिठाया उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विविध राज्यातील प्रसिद्ध मिठाई ग्राहकांना रिलायन्स रिटेलच्या स्टोअरमध्ये एका छताखाली मिळू शकणार आहे. या संदर्भात रिलायन्स इंडस्ट्रीजने रिटेल व्यवसायाच्या माध्यमातून देशातील 50 हून अधिक प्रसिद्ध मिठाई विपेत्यांशी एक करारही केला असल्याचे समजते. त्यांच्या प्रसिद्ध मिठाया आगामी काळामध्ये रिलायन्स रिटेलच्या मॉलमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.