रोवानसह इतर ब्रँडस्ची मिळणार खेळणी
वृत्तसंस्था/ मुंबई
मुकेश अंबानीची मालकी असणाऱया रिलायन्स रिटेलने परवडणाऱया खेळणीच्या उद्योगावर लक्ष देण्याचे निश्चित केले आहे. रोवान या ब्रँड अंतर्गत रियलान्स रिटेलकडून परवडणारी खेळणी आगामी काळामध्ये उपलब्ध केली जाणार आहेत.
या ब्रँडअंतर्गत तयार केलेली खेळणी छोटय़ा शहरांमध्येही विविध दुकानांमध्ये उपलब्ध केली जाणार असल्याचे रिलायन्सकडून सांगण्यात आले आहे. मागच्या तिमाहीमध्ये या संदर्भातील उद्योगाची सुरुवात कंपनीने केली असून चौदाशे चौरस फुट क्षेत्रफळात शोरूमही कंपनीने सुरू केली आहे. एवढंच नाही तर रोवानशिवाय इतर ब्रँडची खेळणीही ग्राहकांना त्यांच्या स्टोअरमध्ये खरेदी करता येणार आहेत. ब्रिटनमधील खेळणी रिटेल ब्रँड हॅम्लीस यांची खेळणी ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.
हॅम्लीसचा 15 देशात विस्तार
हॅम्लीस ही ब्रिटनमध्ये कार्यरत असणारी कंपनी आहे. ब्रिटनमधील ब्रँडेड खेळण्यांची कंपनी हॅम्लीसचा ताबा रिलायन्स इंडस्ट्रीकडे असून 2019 रोजी हिचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जागतिक स्तरावर हॅम्लीसचे सुमारे 15 देशांमध्ये खेळणी विक्रीचे जाळे पसरलेले आहे. जगात सर्वाधिक खेळणी पुरविणारी कंपनी म्हणून हॅम्लीसचा उल्लेख होतो.