ब्रिटनमधील रिटेल फुड क्षेत्रातील कंपनी
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील सर्वात मोठी उद्योजक कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज यांनी रिटेल फुड व्यवसायामध्ये पदार्पण करण्याचा विचार चालविला आहे. याअंतर्गत येत्या काळामध्ये जागतिक स्तरावरील कंपनी प्रेट ए मँगर यांच्याबरोबर भागीदारी करण्याचा विचार कंपनी करते आहे.
सदरची प्रेट ए मँगर ही कंपनी ब्रिटनमधील असून त्यांची इंग्लंड, अमेरिका, युरोप आणि आशियासह 9 देशांमध्ये 550 केंद्रे कार्यरत आहेत. रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड लवकरच प्रेट ए मँगर यांची शॉप्स भारतामध्ये लाँच करणार असल्याचे समजते. सदरच्या कंपनीने आपले पहिले शॉप लंडनमध्ये 1986 मध्ये सुरू केले होते. कंपनी स्वतः खाद्यपदार्थ तयार करते व ताजे रेडी टू मेड फुडही ग्राहकांसाठी सादर करते.
भारतात विस्तारणार व्यवसाय
रिलायन्स ब्रँड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक दर्शन मेहता यांनी, वरील कंपनीबरोबरची भागीदारी भारतासाठी आगामी काळात खाद्यपदार्थांच्या क्षेत्रामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. यायोगे भारतामध्ये खाद्य व बेव्हरेजीस उद्योगाचा विकास साध्य करणे शक्य होणार आहे. सेंद्रीय खाद्य पदार्थांची चव भारतीयांना चाखता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.