Tarun Bharat

वीज ग्राहकांना दिलासा?

दरकपातीसाठी ऊर्जा खात्याकडून हालचाली

प्रतिनिधी / बेंगळूर

आधीच वीजदरवाढीमुळे हैराण झालेल्या राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न ऊर्जा खात्याने चालविला आहे. वीज दरामध्ये कपात करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. घरगुती वापरासह सर्व प्रकारच्या विजेवरील दराम कपात करण्यासाठी ऊर्जा खात्याने प्रस्ताव तयार केला आहे. जर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतला तर वीज दरात प्रतियुनिट 70 पैसे ते 2 रुपयांपर्यंत कपात होऊ शकेल.

दरवर्षी वीजदरवाढ करून ग्राहकांवर अधिक आर्थिक भार टाकण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. हा शिक्का पुसण्यासाठी ऊर्जा खात्याने ठोस भूमिका घेतल्याचे समजते. वीज पुरवठा निगमांनी कर्नाटक वीज नियंत्रण मंडळाला (केईआरसी) वीज दर कपातीसंबंधीची यादी सादर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.

राज्य सरकारने 2022 या वर्षात दोन वेळा वीज दरात वाढ केली आहे. याकरिता कर्नाटक वीज नियंत्रण मंडळाने आर्थिक नुकसानीचे कारण पुढे केले होते. दरम्यान, महागाईमुळे मेटाकुटीला आलेल्या राज्यातील जनतेला सरकारने दिलासा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. घरगुती वापरासह, उच्च दाबाची वीज, उद्योग, व्यावसायिक वीज दरातही कपात होण्याची चिन्हे आहेत.

वाणिज्य वीज वापरकर्त्यांकडून आकारण्यात येणाऱ्या क्रॉस सबसिडीमुळे ते ग्रीड सोडून देत होते. त्यामुळे एचटी ग्राहकांना (उच्च दाबाची वीज वापरकर्ते) दिलासा देण्यासाठी क्रॉस सबसिडी नियम शिथिल करण्याकरिता बेस्कॉम कार्यक्षेत्रात स्वतंत्र शुल्क पद्धतीचा मुद्दा विचारात घेण्यात आला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागासाठी ग्राहकांना 25 पैसे सूट देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 50 युनिटपर्यंत एलटी 2(अ1) आणि एलटी 2(अ2) वीज ग्राहकांकडून प्रतियुनिटसाठी आकारण्यात येणारे प्रतियुनिट 4.15 रुपये आणि 4.05 रुपये शुल्क 3:60 रुपयांपर्यंत आणण्यास ऊर्जा खाते सरसावले आहे.

50 ते 200 युनिटपर्यंत वीज दरासाठी असणारे दोन स्लॅब एकावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 200 युनिट आणि त्यापेक्षा अधिक युनिट वीज वापरल्यास ग्राहकांसाठी सध्या 7.70 रु. आणि 8.20 रु. दर असून तो 7 रुपयांवर आणण्यात येणार असल्याचे समजते.

Related Stories

संपामुळे गजबजणाऱ्या कार्यालयांमध्येही शुकशुकाट

Amit Kulkarni

चिकोडी परिवहनच्या बसमधून डिझेल चोरीचा प्रयत्न

Sandeep Gawade

धर्मांतर बंदी विधेयकावरून विरोधकांचा सभात्याग

Amit Kulkarni

धर्मराज मल्टिपर्पज सोसायटीतर्फे 32 मण सुवर्णसिंहासनासाठी मदत

Amit Kulkarni

जीएसटी अधिकारी सीबीआयच्या जाळय़ात

Patil_p

सोमवारी 182 जण कोरोना बाधित झाले बरे

Patil_p