Tarun Bharat

केरी सत्तरीत पक्षी निरीक्षणातून चेतन पारोडकर यांच्या स्मृतींना उजाळा

पर्ये/ वार्ताहर

केरी -सत्तरीतील विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेचे संस्थापक सदस्य आणि पक्षी अभ्यासक चेतन उर्फ नारायण पारोडकर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा ’चेतन पक्षी निरीक्षण’ हा कार्यक्रम नुकताच पार पाडला.केरीतील अंजुणे धरणाच्या ’ऑकवाड’ कालव्यावर हा कार्यक्रम पार पाडला.यावेळी पक्षी अभ्यासक गजानन शेटय़?  यांनी दुर्बिणीतून पक्षी निरीक्षण करण्याचे तंत्र सहभागी कार्यकर्त्यांना दिले व विविध प्रकारच्या पक्ष्यांची माहिती दिली.यावेळी सुमारे विविध 25  प्रकारच्या पक्ष्यांचे दर्शन झाले.

यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात चेतन पारोडकर यांच्या कार्याची आठवण उपस्थिनांनी केली.यावेळी फौजचे माजी अध्यक्ष राजू पवार यांनी सांगितले की चेतन पारोडकर यांनी म्हादई अभयारण्य परिसरातील जैविक संपत्ती आणि पक्ष्यांच्या वैविध्याची माहिती संकलित करण्याचे कार्य त्यांनी केले.तसेच त्यांनी युवापिढीसाठी पक्षी निरीक्षणाचा पाठ 20 वर्षांपूर्वी घालून दिला होता.चेतन पारोडकर हे  विवेकानंद पर्यावरण जागृती फौज कार्यकर्त्यांना मार्गदर्शक होते असे गौरवोद्गार काढले. 

चेतन पारोडकर यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याविषयी दीपक गावस यांनी सांगितले की पर्यावरण विरोधी बेकायदेशीर प्रकल्पांना आळा घालण्यासाठी त्या प्रकल्पासंबंधी सविस्तर माहिती गोळा करावी आणि त्याची पडताळणी करावी. तसेच त्याचे पुरावे गोळा करावे व त्यानंतर लढा उभारावा असे चेतन पारोडकर मार्गदर्शन करायचे. माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी माहिती हक्काचा वापर बऱयाच वेळा केला होता आणि बेकायदेशीर  प्रकल्पासंबंधी दस्तावेज गोळा केले होते असे सांगितले.

यावेळी प्रमोद नार्वेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संकेत नाईक यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले तर विवेक पारोडकर यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी संकेत नाईक,गजानन शेटय़?,सुजल राजू पवार,दीपक गावस,सायली धर्णे,संगीता सुतार,सुरज मळीक, चंद्रकांत अवखळे,सनिष अवखळे,राजू पवार,कार्तिक गवंडर,भैरो झोरे,ऋतुराज सामंत,प्रमोद नार्वेकर,यशोद फडते,आकाश पाटील,रमेश गावकर,पूजा गावकर व साची झोरे यांची उपस्थिती होती. 

Related Stories

शाळा 15 ऑक्टोबरनंतर सुरू करण्याच्या हालचाली

Patil_p

फोंडा, तिसवाडीला भोवणार पाणी टंचाई

Amit Kulkarni

हरमल येथील भजनी सप्ताह आजपासून

Amit Kulkarni

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत दोन वयोगटात झुंजणार इथॅन वाझ

Patil_p

मोफत मर्यादेपुढील बिलावरच दरवाढ

Amit Kulkarni

भाऊसाहेब समाधी स्थळाच्या देखभालीबाबत सरकार उदासीन !

Amit Kulkarni