प्रतिनिधी /बेळगाव
सहकार क्षेत्रात अनेक अडचणी असल्या तरीही रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या मर्कंटाईल को-ऑप. सोसायटीने उल्लेखनीय प्रगती केली आहे. आज या संस्थेच्या चार शाखा कार्यरत असल्यातरी नजीकच्या काळात या संस्थेने अधिकाधिक शाखा काढाव्यात. त्यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडल्यासारखे होईल, असे विचार बेळगावचे एसीपी क्राईम एन. व्ही. बरमनी यांनी बोलताना व्यक्त केले.
येथील मर्कंटाईल को-ऑप. पेडिट सोसायटीच्या नेहरूनगर येथील शाखेचे स्थलांतर प्लॉट नं. 1363, पहिला मेन, दुसरा क्रॉस विजय बेकर्सच्या बाजुला सदाशिवनगर येथे शुक्रवारी करण्यात आले. त्यावेळी बरमनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते फीत सोडून व शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
अनंत लाड यांच्या प्रास्ताविकानंतर चेअरमन संजय मोरे यांनी स्वागत करून पाहुण्यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. सोसायटीने बावीस वर्षांत केलेल्या कार्याचा आढावा संजय मोरे यांनी घेतला. समाजोपयोगी उपक्रम राबविणारी आमची बेळगाव येथील पहिली संस्था असून नजीकच्या काळात सभासदांच्या हिताचे अनेक उपक्रम राबविणार आहोत, असे त्यांनी सांगितले. रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या संस्थेच्या यशात संचालकांसह कर्मचारी, ठेवीदार व कर्जदार यांचा महत्त्वाचा वाटा आहे, असे ते म्हणाले. भविष्यात इतर चार शाखा स्वतःच्या जागेत स्थलांतरित करण्याचा प्रयत्न आहे, असेही मोरे यांनी सांगितले. शाखा व्यवस्थापक माधुरी खटावकर यांनी आभार मानले. याप्रसंगी व्हा. चेअरमन रमेश ओझा, शारदा सावंत, प्रसन्ना रेवणावर, प्रकाश कालकुंद्रीकर, जयपाल ठकाई, सदाशिव कोळी, किशोर भोसले, राजेंद्र अडकुरकर, मयूर सुळगेकर व सरिता कणबरकर यांच्यासह विराज भातखंडे, अपर्णा पाटील, अतुल कपिलेश्वरी व इतर उपस्थित होते.