Tarun Bharat

विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास वाहक-चालकांची टाळाटाळ

Advertisements

किणये रस्त्यावर मनमानी : रणकुंडये क्रॉसजवळील प्रकार : दोन बसेस पाठोपाठ येऊनही थांबवण्यास नकार

वार्ताहर /किणये

शाळा-कॉलेजला जाण्यासाठी किणये रस्त्यावर थांबलेल्या विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास बसच्या वाहक व चालकांनी टाळाटाळ केली. एकाचवेळी दोन बसेस बेळगावकडे जात असतानाही एकही बस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी थांबविण्यात आली नाही. सदर प्रकार शुक्रवारी सकाळी 8 च्या दरम्यान रणकुंडये क्रॉसजवळ घडला. यामुळे विद्यार्थी व प्रवासी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शुक्रवारी सकाळी रणकुंडये क्रॉसजवळील बसथांब्याच्या ठिकाणी विद्यार्थी व प्रवासी बसच्या प्रतीक्षेत  थांबले होते. यावेळी एकापाठोपाठ दोन बसेस आल्या. त्या दोन्ही बसला विद्यार्थ्यांनी हात करून थांबवण्याची विनंती केली. मात्र बसमधील वाहक व चालकांच्या मनमानीमुळे एकही बस थांबली नाही. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांनी शाळा-कॉलेजला जायचे कसे, असा प्रश्न पालकांतून करण्यात येत आहे.

बडस गावची बस कर्लेमार्गे बेळगावला जात होती. तसेच जानेवाडी गावची बस कर्ले, बहाद्दरवाडी, शिवनगरमार्गे बेळगावला जात होते. मात्र रणकुंडये क्रॉस येथील विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यासाठी बसथांब्याच्या ठिकाणी थांबविण्याची गरज असतानाही सदर दोन्ही बसच्या वाहक व चालकांनी बस थांबविली नाही, अशी माहिती नागरिकांनी दिली.

बेजबाबदार वाहक-चालकांवर कारवाईची गरज

शुक्रवारी सकाळी आठच्या दरम्यान दुचाकीवरून बेळगावला जात होतो. रणकुंडये क्रॉस येथील बसथाब्ंयाजवळ विद्यार्थी बसची वाट पहात होते. जानेवाडी आणि बडस या दोन्ही बस आल्या. मात्र त्या न थांबताच गेल्या. आम्ही त्या बसेसचा पाठलाग करून वाहक व चालकांना विचारलो असता त्या बसवाल्याला सांगा, त्याने थांबवायला पाहिजे. दुसरा अन्य बसला सांगा, असे सांगत होते. अशा बेजबाबदार वाहक व चालकांवर कारवाई करण्याची गरज आहे.

बस थांबवत नसतील तर विद्यार्थ्यांनी जायचे कसे ?

किणये परिसरातील विद्यार्थी रोज शाळा-कॉलेजला मोठय़ा संख्येने बेळगावला जातात. त्यांनी बसपास काढला आहे. त्यामुळे त्यांना बसनेच प्रवास करावा लागणार आहे. बसवाहक व चालक बस थांबवित नसतील तर त्या विद्यार्थ्यांना शाळेला वेळेवर पोहचणे अवघड होणार आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांना योग्य ती वागणूक देऊन त्यादृष्टीने वाहक व चालकांनी प्रामाणिक सेवा बजावली पाहिजे.

Related Stories

खानापूर-लेंढा-रामनगर महामार्ग पावसाळय़ापूर्वी खुला करा

Patil_p

कृष्णाकाठ योजनेसाठी 10 हजार कोटी

tarunbharat

नागरिकांच्या सुरक्षेसाठी चक्क झाडाच्या फाद्यांचा आधार

Amit Kulkarni

‘निजामुद्दीन कनेक्शन’मुळे जिल्हय़ात सतर्कता

Patil_p

केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

Rohan_P

किल्ल्यांच्या संरक्षणासाठी मावळे सज्ज

Patil_p
error: Content is protected !!