Tarun Bharat

विभागीय क्रीडा स्पर्धेत अबनाळी शाळेचे उल्लेखनीय यश

Advertisements

गुंजी : येथे झालेल्या गुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या शाळेने सांघिक खेळात मुलांच्या थ्रोबॉलमध्ये प्रथम क्रमांक, मुलींच्या थ्रोबॉलमध्ये प्रथम क्रमांक तसेच व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक तर रिलेमध्ये तृतीय क्रमांक मिळविला. वैयक्तिक खेळात गुरुप्रसाद संजय गावकर उंच उडीमध्ये प्रथम, वरूणा देमानी पोटे मुलींच्या उंच उडीमध्ये प्रथम, रविदास परशराम गावकर लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवत तालुका स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

तसेच बुद्धिबळ क्रीडा प्रकारात मुलांच्या गटातून श्रीधर धानाप्पा करंबळकर, सचिन प्रभाकर डिगेकर, अजय अनिल पास्टोलकर, रविदास परशराम गावकर, गुरुप्रसाद संजय गावकर तर मुलींच्या गटातून सातुली रमेश गावकर, प्रेमीला लक्ष्मण मेंडीलकर, मलप्रभा मारुती गुरव, समीक्षा संतोष गावकर, वर्षा विलास मेंडीलकर विजयी झाले असून तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पीएस गुरव, रमेश कवळेकर, विजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे तर एसडीएमसी अध्यक्ष प्रभाकर डिगेकर आणि गावकऱयांचे प्रोत्साहन मिळत आहे. या यशाबद्दल खानापूर तालुक्मयाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती राजेश्वरी कुडची, बीआरसी अधिकारी ए आर अंबगी, अक्षरदासोह अधिकारी महेश परीट, शिरोली सीआरपी बी.ए.देसाई यांनी अबनाळी शाळेचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

बाबू काकेरू चौकात पुतळा उभारणार

Amit Kulkarni

ऑटोरिक्षा अपघातात अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू

Patil_p

खानापूर शहरातील दुकानांच्या वेळावर पुन्हा निर्बंध

Patil_p

सीएएविषयी अफवावर विश्वास ठेवू नका

Patil_p

तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला

Amit Kulkarni

म.ए.समितीचे नेते जोतिबा पाटील यांचे निधन

Omkar B
error: Content is protected !!