ब्रिटन अन् नाटो देशांना रशियाची धमकी
युक्रेनला मिळत असलेली पाश्चिमात्य मदत रशियासाठी घातक ठरतेय. युक्रेनला मदत करणाऱया ब्रिटनच्या सैन्य तळांना लक्ष्य करू शकतो. तसेच युक्रेनमध्ये परतणाऱया ब्रिटिश मुत्सद्यांना लक्ष्य करू शकतो अशी धमकी रशियाने दिली आहे. कीव्हमधील स्वतःचा दूतावास पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा ब्रिटनने अलिकडेच केली आहे.
युक्रेनला शस्त्रास्त्रs पुरविणाऱया नाटो देशांवरही हल्ला केला जाऊ शकतो. सैन्य विषयक पुरवठा रोखण्यासाठी रशिया नाटो देशांच्या क्षेत्रांमधील सैन्य तळांवर हल्ला करू शकतो. शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत असल्याने युक्रेनमध्ये मृत्यू आणि रक्तपात होत असल्याचे रशियाच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जाखारोवा यांनी म्हटले आहे.
युक्रेनियन सैनिकांना प्रशिक्षण
रशियाच्या सैन्यविषयक ठिकाणांवर युक्रेनकडून होत असलेल्या हवाईहल्ल्यांचे ब्रिटन समर्थन करतो. अशाप्रकारच्या हल्ल्यांमध्ये ब्रिटिश शस्त्रास्त्रांचा वापर पूर्णपणे वैध आहे. जर डोनेट्स्क आणि लुहान्स्कमधील संघर्ष लांबल्यास ब्रिटन युक्रेनमध्ये त्याच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यास पुन्हा सुरुवात करणार असल्याचे उद्गार ब्रिटनचे संरक्षणमंत्री जेम्स हेप्पी यांनी काढले आहेत. हेप्पी यांच्या या विधानाला रशियाच्या संरक्षणमंत्रालयाने चिथावणीखोर ठरविले आहे.