Tarun Bharat

आठ दिवसात भगतसिंह कोश्यारींची पदावरून हकालपट्टी करा, अन्यथा महाराष्ट्रात एकही…; स्वराज्य संघटनेचा इशारा

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari) हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या महापुरुषांचा वारंवार अपमान करत असल्याने राज्यपालांविरोधात संभाजीराजे छत्रपती यांच्या (Sambhajiraje Chatrapati) स्वराज्य संघटनेचे (swarajya sanghatana) पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यपालांना वेळीच आवर घालून हकालपट्टी करा, अन्यथा महाराष्ट्रात एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा कडक इशारा स्वराज्य संघटनेने दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा (chhatrapati shivaji maharaj) वारंवार अपमान करणाऱ्या राज्यपालांना तातडीने दिल्लीला बोलवून घ्या, अन्यथा महाराष्ट्रामध्ये त्यांचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा स्वराज्य संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. कोल्हापुरातील स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. येत्या आठ दिवसात राज्यपालांना पदावरून हटवावे अन्यथा याचा राज्यभरात उद्रेक पहायला मिळेल. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास याला सर्वस्वी राज्य सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार राहील, असा इशारा स्वराज्य संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

हे ही वाचा : ९२ नगरपरिषदांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Related Stories

कोल्हापूर : एसटी फेरी बरोबर मुलींचे शिक्षणही बंद

Archana Banage

महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक मनसे स्वबळावर लढणार

Archana Banage

कोल्हापूर : विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा 17 पासून

Archana Banage

शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप जोशी यांचे निधन

Archana Banage

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीवर प्रशासक

Archana Banage

भिंत अंगावर पडून कावणेतील युवकाचा मृत्यू

Archana Banage