नवीन झाडे लावण्याची वकील-पक्षकारांतून मागणी : धोकादायक झाडांबाबत अनेक तक्रारी
प्रतिनिधी /बेळगाव
झाड पडून मृत्यू होण्याच्या घटना शहरामध्ये घडत आहेत. त्यानंतर आता धोकादायक झाडांबाबत अनेकजण तक्रार करू लागले आहेत. रस्त्यांवर तसेच शासकीय कार्यालयाच्या परिसरात अनेक धोकादायक झाडे आहेत. ती झाडे हटविणे जरुरीचे आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातही काही झाडे धोकादायक असून ती झाडे हटवून त्या ठिकाणी नवीन झाडे लावावीत, अशी मागणी होत आहे.
जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातील मागील बाजूस गुलमोहर तसेच हलक्मया दर्जाची अनेक झाडे आहेत. ती कधी कोसळतील, याची शाश्वती नाही. काही झाडे कलंडली आहेत. याचबरोबर झाडाच्या बुडक्मयाच्या परिसरात काँक्रीट तसेच पेव्हर्स असल्यामुळे तीही कधी कोसळतील, याची शाश्वती नाही. या ठिकाणी कॅन्टीन आहे. त्याचबरोबर वाहनेही पार्किंग केली जातात. वर्दळ अधिक आहे. तेव्हा जी धोकादायक झाडे आहेत ती बार असोसिएशनने हटवावीत, अशी मागणी वकील तसेच पक्षकारांतून केली जात आहे.
मजबूत असलेली झाडेच लावण्याची मागणी
जेएमएफसी न्यायालयाच्या परिसरात यापूर्वी झाडे लावणे आवश्यक होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे झाडे लावताना मजबूत असलेली झाडेच लावावीत, अशी मागणी वारंवार होत आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात खुल्या जागेमध्ये मोठय़ा प्रमाणात झाडे होती. मात्र, त्या ठिकाणी न्यायालयासाठी एका इमारतीची बांधणी करण्यात आली असल्यामुळे झाडांची कत्तल करण्यात आली आहे.
झाडे हवीत, मात्र धोकादायक नसावीत…
झाडे हवीत, मात्र ती धोकादायक नसावीत, असे मत व्यक्त होत आहे. जेएमएफसी न्यायालयाचा आवार मोठा आहे. याचबरोबर मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या आवारात देखील अनेक झाडे आहेत. मात्र, या संपूर्ण आवारामध्ये पेव्हर्स तसेच काँक्रीट घालण्यात आल्यामुळे ती झाडेही धोकादायक ठरू लागली आहेत. तेव्हा मुख्य जिल्हासत्र तसेच जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातील धाकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी होत आहे.