Tarun Bharat

शहर, उपनगरातील धोकादायक झाडे हटवा

नागरिकांची मागणी : झाडे कोसळल्याने अनेक दुचाकींसह विद्युतखांबांचे होतेय मोठे नुकसान

प्रतिनिधी /बेळगाव

पाऊस आणि वाऱयामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे कोसळली. वाहनांचे नुकसान झाले. तसेच चारच दिवसांपूर्वी एका निष्पापाचा बळी गेला. गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाऱयासह वळिवाचे आगमन होत आहे. त्यामुळे झाडे कोसळण्याचे प्रमाण वाढले आहेत. तेंव्हा शहर व उपनगरांमध्ये असलेली धोकादायक झाडे तातडीने हटविण्याची मागणी होत आहे.

यावषी वळिवाने शहरासह ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसापेक्षा वादळीवाराच अधिक प्रमाणात येत आहे. त्यामुळे झाडे कोसळणे, घरावरील पत्रे उडून जाणे, झाडे कोसळून जीवितहानी होणे, पिकांचे मोठे नुकसान होणे, वीज पडूनही जीवितहानी होणे अशा घटना घडल्या आहेत. वळिवामुळे आणि जोरदार वाऱयामुळे साऱयांच्याच मनात धडकी भरत आहे.

रस्त्याच्या शेजारी असलेली झाडे कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक झाडांच्या फांद्या कोसळून विद्युतखांब व विजेच्या तारांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे हेस्कॉमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवार दि. 19 एप्रिल रोजी तर वळीव आणि जोरदार वाऱयामुळे अक्षरशः साऱयांचीच दैना उडाली होती. त्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील नागशांतीसमोर असलेले भलेमोठे झाड पार्किंग करण्यात आलेल्या दुचाकींवर कोसळले. यामध्ये जवळपास 20 हून अधिक दुचाकींचे आणि काही सायकलींचे नुकसान झाले होते.

क्लब रोडवरुन काळीआमराईकडे जाणाऱया विजय कोल्हापुरे यांच्या अंगावर झाड कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. याचबरोबर त्या दिवशी शहरामध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळली होती. यापूर्वीही झालेल्या वळीव पावसामध्ये अनेक ठिकाणची झाडे आणि विद्युत खांब कोसळून मोठे नुकसान झाले आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागामध्येही झाडे कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साऱयांच्याच मनात धडकी भरली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये दररोज दुपारी जोरदार वाऱयासह ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन होत आहे. त्यामुळे दुपारनंतर साऱयांचीच तारांबळ उडत आहे. धोकादायक झाडे अनेकांचे बळी घेत आहेत. तेंव्हा महापालिका, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जी धोकादायक झाडे आहेत, ती हटवावीत. तसेच ज्या झाडांच्या फांद्या धोकादायक आहेत, त्या तोडाव्यात, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

शेतकऱयांना बसतोय फटका

गेल्या काही वर्षांमध्ये मार्चपासूनच वळिवाला सुरूवात होत आहे. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान होत आहे. याचबरोबर शहरामध्येही नुकसान होताना दिसत आहे. शहराबाहेर तसेच गावाबाहेर असलेल्या घरांवरील कौले, पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. मोठी झाडे तसेच नारळाची झाडे देखील कोसळून नुकसान होत आहे. सध्या शहरामध्ये स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक रस्ते काँक्रिटचे बनविण्यात आले आहेत. त्यामुळे झाडांच्या बुडक्मयांना आधार मिळणे कठीण झाले आहे. झाडांची मुळे खराब होत आहेत. त्यामुळे झाडे कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. तेंव्हा तातडीने अशी झाडे हटवावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

Related Stories

निजामुद्दीन कार्यक्रमाला जिल्हय़ातूनही हजेरी

Patil_p

लोकमान्य मिलिटरी ट्रेनिंगच्या बॅचला लवकरच प्रारंभ

Amit Kulkarni

मराठी सत्तेसाठी नव्या चेहऱयांच्या पाठीशी

Amit Kulkarni

खैरवाड संपर्क रस्त्यावर दलदल

Amit Kulkarni

पंढरपूर येथील माउली सभामंडप-ट्रस्ट कार्यालयाचे उद्घाटन

Amit Kulkarni

जय जय शिवराया श्रम जाती वाया

Omkar B