मिलिंद गृहनिर्माण सहकारी संस्थेचा इसारा, अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना घातला गराडा
प्रतिनिधी/ सातारा
सिटी सर्व्हे नंबर 408।1 अ हा शासकीय मुलींच्या होस्टेलसाठी राखीव ठेवण्यात आले होते. या जागेत यापूर्वी नगराध्यक्षांच्या निवासस्थानासाठी राखीव ठेवलेली जागा होती. परंतु तेथे पालिकेने बांधकाम केले नव्हते. शासकीय जागा असल्याने त्या जागेवर दि. 3 रोजी अनाधिकृतरित्या खाजगी लोकांनी झोपड्या टाकलेल्या आहेत. त्या हटवण्यात याव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने पालिकेच्या समोर आंदोलन छेडू असा इशारा सोसायटीचे चेअरमन मिलिंद काकडे, सचिव सुशिल तुपसुंदर यांच्यासह सदस्यांनी दिलेला आहे. दरम्यान, पालिकेत अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यास गराडा घालून विचारणा करण्यात आली.
निवेदन देताना सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट आणि जिल्हाधिकारी ऊचेश जयवंशी यांना देण्यात आले आहे. निवेदन देताना सोसायटीचे चेअरमन मिलिंद काकडे, सचिव सुशिल तुपसुंदर, अऊण कांबळे, के. के. गायकवाड, सुदाम आवळे, बंडू कांबळे, आतिष कांबळे, अऊण कांबळे, संतोष सदामते, दत्तात्रय आवळे, सुरेंद्र दुधगावकर आदी उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मिलिंद सहकारी गृहनिर्माण संस्थेला जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेश दि. 6 जानेवारी 1975 अन्वये संस्थेच्या सिटी सर्व्हे नंबर 409।1 मधील 409।1 ब हा संस्थेच्या सभासदांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध कऊन दिली. तसेच सिटी सर्व्हे नंबर 409।1 क हा संस्थेला बगिचा म्हणून मंजूर करण्यात आला. तसेच 408।1 अ हा शासकीय संस्थेच्या मुलींच्या होस्टेलसाठी राखीव ठेवण्यात आला होता. राखीव ठेवलेल्या जागेत यापूर्वी नगरपालिका अध्यक्ष यांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी राखीव ठेवण्यात आले होते. परंतु त्या ठिकाणी पालिकेचे बांधकाम केले नाही. सध्या ही जागा शासनाच्या अधिकारात असल्याने त्या जागेवर दि. 3 फेब्रुवारी 2023 रोजी अनाधिकृतरित्या खाजगी लोकांनी झोपड्या टाकल्या आहेत. त्या झोपड्या काढण्यात याव्यात. या झोपड्या काढल्या नाहीत तर संस्थेमध्ये रहात असलेल्या सभासदांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक होत असल्याने झोपड्या काढाव्यात अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे. तत्पूर्वी पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना गराडा घालून त्यांना अतिक्रमण कसे आहे दाखवण्यात आले.