ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमने-सामने आले होते. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाटय़ावर आली होती. आता विदर्भातील 24 नेत्यांनी पटोलेंच्या विरोधात भूमिका घेत त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटविण्याची मागणी केली आहे.
विदर्भातील काँग्रेसच्या 24 नाराज नेत्यांनी पक्ष निरीक्षक रमेश चेन्निथाला यांची भेट घेतली. नाना पटोले यांच्यामुळे पक्षात गटबाजीला सुरुवात झाली. त्यांची पक्षात मनमाणी सुरू असून, ते कोणाचेही ऐकत नाहीत. ते पक्षात नानागिरी सुरू करणार असल्याचे म्हणतात. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून आदिवासी नेते शिवाजी मोघे यांना प्रदेशाध्यक्ष करावे, अशी मागणी या नेत्यांनी चिन्निथाला यांच्याकडे केले. यामध्ये प्रदेश काँग्रेसचे सचिव खान नायडू, प्रदेश काँग्रेसचे सदस्य प्रकाश मुगदीया, सरदार महेंद्र सिंग सलूजा, इक्राम हुसैन यांच्यासह 24 नेत्यांचा समावेश आहे.
अधिक वाचा : भारत सरकारने कोल्हापुरच्या जवानाला केले ‘पळपुटा’ घोषित
दरम्यान, पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यासाठी हे सर्व नेते लवकरच हायकमांडला भेटण्यासाठी रायपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात जाणार असल्याची माहिती आहे.