Tarun Bharat

फुटपाथवर ठाण मांडलेल्या फळ विक्रेत्यांना हटविले

एपीएमसी रोडशेजारी मनपाकडून कारवाई

प्रतिनिधी /बेळगाव

शहरातील फुटपाथ, सायकल ट्रक आणि रस्त्याशेजारी विविध प्रकारचे व्यवसाय थाटून अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रारी वाढल्याने मंगळवारी एपीएमसी रोडशेजारी फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली. यापूर्वीदेखील कारवाई करून हातगाडय़ा हटविण्याची सूचना केली होती. पण याची दखल घेण्यात आली नसल्याने कारवाईवेळी तीन हातगाडय़ा जप्त केल्या.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोटय़वधी निधी खर्च करून फुटपाथ, सायकल टॅक आणि रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले आहे. मात्र बहुतांश फुटपाथवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. सायकल ट्रकचा वापरदेखील व्यावसायिक करू लागले आहेत. त्यामुळे सायकल चालक आणि पादचाऱयांनी कसे जायचे? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. तसेच काही ठिकाणी फुटपाथवर वाहने पार्क केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणाबाबत महापालिकेकडे असंख्य तक्रारी दाखल झाल्या आहेत.

या तक्रारीची दखल घेऊन रस्त्याशेजारील अतिक्रमणे हटविण्याचा आदेश महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी दिला होता. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी  फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली होती. एपीएमसी रोडशेजारील फुटपाथवर काही फळविपेत्या व्यावसायिकांनी कायमस्वरुपी खोके थाटले आहेत.

त्यामुळे फुटपाथचा वापर व्यावसायिक करीत असल्याने खोके हटविण्याची सूचना करण्यात आली होती. पण याकडे दुर्लक्ष करून फळविपेत्यांनी व्यवसाय थाटले होते. त्यामुळे पादचाऱयांसाठी निर्माण करण्यात आलेल्या फुटपाथवर व्यावसायिकांनी ठाण मांडल्याने पादचाऱयांनी कसे जायचे? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

अचानक कारवाई केल्याने फळविपेत्यांचे नुकसान

 येथील अतिक्रमणाबाबत रहदारी पोलिसांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यामुळे महापालिका आरोग्य अधिकाऱयांच्या आदेशानुसार मंगळवारी सकाळी एपीएमसी रोडशेजारील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली. कायमस्वरुपी खोके हटविण्यासह काही खोके जप्त करण्यात आले. पूर्वसूचना न देता अचानक कारवाई केल्याने फळविपेत्यांचे नुकसान होत आहे, असे सांगून कारवाईला आक्षेप घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण यापूर्वी मुदत देऊनही व्यवसाय हटविले नसल्याने मनपाने कारवाईचा बडगा उगारला. मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासह रहदारी पोलीस सहभागी झाले होते.

Related Stories

गोकर्ण येथे अरबी समुद्रात बुडून तीन पर्यटकांचा मृत्यू

Omkar B

एसीबीचे राज्यभरात 80 ठिकाणी छापे

Amit Kulkarni

अखंडपणे चालत आलेल्या दिंडय़ांना कोरोनाचा ब्रेक

Patil_p

विणकर-नामदेव शिंपी समाजातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Patil_p

ख्रिसमससाठी सांताक्लॉजचे आकर्षण

Patil_p

दररोजच्या पावसाने सारेच हतबल

Omkar B