Tarun Bharat

WHO कडून ‘मंकिपॉक्स’चे नामांतर; ‘हे’ असेल नवे नाव

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

जागतिक आरोग्य संघटनेने ‘मंकीपॉक्स’ (Monkeypox) आजाराचं नाव बदलून ‘एमपॉक्स’ (MPOX) असं केलं आहे. सध्या वर्षभरासाठी मंकीपॉक्स आणि एमपॉक्स ही दोन्ही नावं वापरली जातील. त्यानंतर मंकिपॉक्स नावाचा वापर हळूहळू बंद होईल.

जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कोरोनानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये मंकिपॉक्सने हातपाय पसरले. जेव्हा मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वाढू लागला तेव्हा अनेकदा यासंदर्भात वर्णद्वेषी आणि आक्षेपार्ह भाषा वापरली जात असल्याचं निदर्शनास आलं. यावर चिंता व्यक्त करत अनेक देशांनी डब्ल्यूएचओला या आजाराचं नाव बदलण्यास सांगितलं होतं. त्यानुसार डब्लूएचओने मंकीपॉक्ससाठी एमपॉक्स हे नवं नाव लागू करण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा : राज्यात थंडी कमी; उकाडा कायम

मंकिपॉक्स आणि एमपॉक्स ही दोन्ही नावं वर्षभर वापरली जातील. त्यानंतर मंकीपॉक्स हा शब्द वगळला जाईल. डब्लूएचओच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जगभरात मंकिपॉक्सचे 80 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामधील 55 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

‘हवामान अराजकते’च्या दिशेने पृथ्वीची वाटचाल

Patil_p

जन्माष्टमीचा उपवास धरला म्हणून विद्यार्थ्यांना मारहाण; शिक्षकाचं तात्काळ निलंबन

Archana Banage

चीनला जबाबदार धरण्याची तयारी सुरू

Patil_p

आता तुम्ही कारमध्ये पेट्रोल भरत नाही का? : आव्हाडांचा अमिताभ बच्चन यांना थेट सवाल

Tousif Mujawar

चीन,जपान मधून येणाऱ्यांसाठी कडक निर्बंध, RT-PCR बंधनकारक

Rahul Gadkar

मराठा आरक्षण प्रश्नावर पंतप्रधान मोदींची भूमिका महत्त्वाची – अशोक चव्हाण

Archana Banage