Tarun Bharat

खानापूर आरोग्य केंद्र नूतनीकरणास प्रारंभ

Advertisements

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांदे यांची माहिती : 18 लाखाचा निधी मंजूर : रुग्णांना सुविधा देण्याचा प्रयत्न

वार्ताहर /खानापूर

येथील तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक सुविधांचा अभाव होता. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. 18 लाखांच्या निधीतून चिकित्सा विभागासह अनेक ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती तालुका प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांदे यांनी दिली.

50 खाटांचे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या या केंद्रात अलीकडच्या काळात 100 खाटांचे कामकाज चालते. रुग्णालयातील स्वच्छता व चिकित्सा विभागात सुविधा नसल्याच्या तक्रारी होत्या. यानुसार जिल्हा पंचायतीच्या विशेष अनुदानातून 25 लाखाचा निधी मंजूर झाला. या अंतर्गत सदर निविदा अठरा लाखाला मंजूर झाली आहे. यातून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

दवाखान्यातील गैरसोयी दूर होणार

 या कामांतर्गत आरोग्य केंद्राच्या दर्शनी भागात नव्याने चिकित्सा विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याप्रमाणे प्रसूती कक्षाचे तसेच स्त्री रुग्ण कक्षाचे नूतनीकरण, सर्व शौचालय स्वच्छता गृहाचे नूतनीकरण या निधीतून हाती घेण्यात आले आहे. यामुळे दवाखान्यातील गैरसोयी दूर होणार आहेत.

कायमस्वरुपी जनरेटर मंजूर करण्याची मागणी

सध्या वारंवार होणाऱया खंडित वीज पुरवठय़ामुळे अनेकवेळा गैरसोय होते. यासाठी कायमस्वरुपी एक जनरेटर मंजूर करण्यात यावे, अशा मागणीचा प्रस्तावही वरि÷ांच्याकडे पाठविला आहे असे, त्यांनी सांगितले. यावेळी तालुका आरोग्य केंद्रातील साहाय्यक अधिकारी शिवानंद स्टाफ रुद्राप्पा, गीता मर्डीमनी, वीरप्पा, श्रीधर आदी उपस्थित होते.

येत्या सहा महिन्यात इमारतीचे बांधकाम पूर्ण

तालुका आरोग्य केंद्राच्या आवारात आता बाल चिकित्सा व महिला प्रसूती केंद्राची उभारणीही करण्यात येत आहे यासाठी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे प्रयत्न मार्गी लागले आहेत. इमारतीचे कामही प्रगतिपथावर आहे, या इमारतीसाठी पंधरा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे येत्या सहा महिन्याच्या आत इमारतीचे बांधकाम पूर्णत्वाला येण्याची शक्यता आहे.

Related Stories

टेंपररी विद्युत मिटरचा खर्च जाचक

Patil_p

अखेर सर्वोदय कॉलनीतील घरांवर फिरविला जेसीबी

Omkar B

चालकाचे नियंत्रण सुटून शिवारात कोसळला ट्रक

Patil_p

कचरावाहू वाहनाच्या बॅटरीची चोरी झाल्याने कचरा उचल ठप्प

Amit Kulkarni

शिवपुतळा जागेवरुन मणगुत्तीत तणाव

Patil_p

हिंडलगा ग्रा.पं.सदस्यांच्यावतीने कोरोनायोद्धय़ांचा सत्कार

Omkar B
error: Content is protected !!