Tarun Bharat

शर्कत पार्कचे सुशोभिकरण

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

शर्कत पार्कच्या विकासाची सूचना कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत करण्यात आली होती. शर्कतपार्कच्या स्वच्छतेसह परिसरातील विकासकाम सुरू करण्यात आले आहे. दर्शनी भागाच्या ग्रीलची रंगरंगोटीदेखील कॅन्टोन्मेंटकडून करण्यात आली. शर्कत पार्कमध्ये विविध कार्यक्रम केले जातात. काहीजण या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी घेऊन येत असतात. तर कॉलेजमधील काही विद्यार्थी या ठिकाणी वाढदिवस व इतर कार्यक्रम करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम होत असल्याने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत कॅन्टोन्मेंट अध्यक्षांनी बैठकीमध्ये व्यक्त केले होते. तसेच शर्कत पार्कच्या विकासासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचनादेखील केली होती. त्यानुसार उद्यानात कोसळलेली झाडे हटविण्यासह स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. त्याचप्रमाणे रंगरंगोटी करून सुशोभिकरण करण्यात आल्याने उद्यानाच्या सौंदर्यात भर पडली आहे.

Related Stories

जितोतर्फे स्वातंत्र्यदिनी महारक्तदान शिबिर

Omkar B

आनंद घेण्यासाठी कला हवी ज्येष्ठ चित्रकार काशिनाथ हिरेमठ यांचे मत

mithun mane

शिक्षिका कलावती पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Amit Kulkarni

कंग्राळी खुर्द येथे बलिदान मासला प्रारंभ

Amit Kulkarni

परिवहनचे कर्मचारी ऑक्टोबरच्या वेतनाविना

Patil_p

‘त्या’ कमानीबाबत उचगावमध्ये बैठक

Amit Kulkarni
error: Content is protected !!