प्रतिनिधी /पर्वरी
येथील आरजी हॉस्पिटलनजीक बुधवारी सकाळी 7.30 वा. रेंट अ कार (जीए 03 डब्ल्यू 6573) वीज खांबाला धडक देत फुटपाथवर उलटली. या विचित्र अपघातात रेंट अ कार सह अन्य दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेंट अ कारमध्ये एक राजस्थानी जोडपे होते. चालक नशेत असल्याने वाहनावरचा त्याचा ताबा सुटला व त्याने सरळ विजेच्या खांबाला ठोकली. त्यात ती कार फुटपाथवर उलटली. त्यामुळे हॉस्पिटल समोर पार्क करून ठेवलेल्या स्कूटर त्यात चिरडल्या गेल्या. कारमधील जोडप्याला किरकोळ दुखापत झाली. पर्वरी पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहे.