प्रतिनिधी /बेळगाव
उषाताई गोगटे कन्या विद्यालयात सन् 2022-23 वर्षासाठी इंटरॅक्ट क्लबची पुनर्रचना शनिवार दि. 23 रोजी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून क्लबचे माजी अध्यक्ष ऍड. सचिन बिच्चू उपस्थित होते. त्यांनी क्लबच्या पदाधिकाऱयांना सूत्रे देऊन विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
क्लबमध्ये सहभागी झाल्यास नेतृत्वाचे धडे व समाजोपयोगी कार्य करण्यास प्रेरणा मिळते. भविष्य घडविणे आपल्या हातात असते. त्यामुळे एखाद्या क्षेत्रात श्रे÷ होण्याचे स्वप्न पाहून ते प्रयत्नांती पूर्ण करण्याचा सल्ला त्यांनी दिला. विद्याभ्यासाबरोबर जीवनोपयोगी गोष्टी शिकून समाजोपयोगी उपक्रम राबविले पाहिजेत, असे ते म्हणाले.
अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे भावी अध्यक्ष जगदीश सिद्धन्नवर होते. क्लबच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱया अनेक प्रकल्पांबद्दल त्यांनी माहिती दिली. रोटरी क्लबचे पदाधिकारी अक्षय कुलकर्णी, मनीषा हेरेकर, श्रीनिवास देशपांडे उपस्थित होते. मुख्याध्यापक एम. के. मादार, क्लब प्रमुख शिक्षक वाय. एच. कांबळे, शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. वनिता मुतवल्ली हिने सूत्रसंचालन केले.
सन 2022-23 वर्षाचे इंटरॅक्ट क्लबचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे-अध्यक्षा वर्षा कोरीमठ, भावी अध्यक्षा वैभवी जोशी, उपाध्यक्षा प्रतीक्षा पाटील, सचिव श्राव्या शेट्टी, सहसचिव भूमी बडीगेर, खजिनदार मधू हाशिलकर, संचालक दिव्या पिशेन्नवर, श्वेता कुंदरनाड, श्रीरक्षा इटगीकर, सिंचन कोपर्डे, रक्षिता मुळे व भूमिका मकाटे यांची निवड झाली.