मडगाव : मडगाव आणि फातोर्डा परिसरातील काही रस्त्यांची धोकादायक व वाईट अवस्था झाली असल्याचे शिवसेनेने एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (रस्ते) विभाग-6 च्या कार्यकारी अभियंत्यांच्या निदर्शनास आणले आहे. सनरीट हॉटेल ते हिमालय फॅक्टरी हा दुचाकींसाठीच पूल, फुर्तादो बार, खारेबांद ते गोवा गेस्ट हाऊस हा दुचाकींसाठीचा पूल, आयसीआयसीआय बँक ते पेड-खारेबांद, मडगाव हा दुचाकींसाठीचा पूल तसेच कालकोंडा येथील झांटय़े मेन्शन ते वसंत विर्डीकर निवास आणि मडगाव व फातोर्डा परिसरांतील इतर काही ठिकाणचे रस्ते बिघडलेले आहेत. त्यामुळे अपघात होऊन निष्पाप लोकांचे जीव जाऊ शकतात. हे टाळण्यासाठी सदर भागांची पाहणी करून लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती सुरू करावी, अशी विनंती शिवसेनेच्या गोवा राज्य शाखा विस्तार समिती प्रमुख राजू विर्डीकर यांनी या निवेदनात केली आहे.
Previous Articleभोम पंचायत मैदानाची क्रीडामंत्र्यातर्फे पाहणी
Next Article केपेतील शिमगोत्सव मिरवणूक उत्साहात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.