पावसाळय़ापूर्वी ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीची मोहीम
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाळय़ाच्या दिवसात ट्रान्स्फॉर्मर निकामी होऊन वीज वितरणामध्ये व्यत्यय येतो. हे टाळण्यासाठी पावसाळय़ापूर्वीच संपूर्ण ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करण्याची मोहीम हेस्कॉमकडून सुरू आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्हय़ात 15 हजार 812 ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करण्यात आली आहे. ट्रान्स्फॉर्मरच्या दुरुस्तीसोबतच स्थानिक नागरिकांना ट्रान्स्फॉर्मरखाली कचरा टाकू नये, असे आवाहनही केले जात आहे.
ट्रान्स्फॉर्मरची वेळच्यावेळी दुरुस्ती न केल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. ट्रान्स्फॉर्मरमधून आगीच्या ठिणग्या पडणे, मोठय़ाने आवाज येणे, विद्युतवाहिन्यांमध्ये पेट घेणे, ट्रान्स्फॉर्मरमधून होणारी ऑईल गळती यामुळे अपघात होत असतात. अपघात रोखण्यासाठी राज्य विद्युत विभागाने ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करण्यासाठी मोहीम उघडली. 5 ते 20 मे दरम्यान राज्यातील सर्व ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती केली जाणार आहे.
बेळगाव शहर, तालुक्मयासह जिल्हय़ात सर्वत्र ही मोहीम राबविली जात आहे. प्रत्येक ट्रान्स्फॉर्मरची स्थिती समजावी, तसेच ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी ट्रान्स्फॉर्मरखाली उभे राहून लाईनमनला जीपीएस करावे लागत आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील 7 हजार 565 (25 केव्हीए), 4 हजार 142 (63 केव्हीए), 3 हजार 657 (100 केव्हीए), 445 (250 केव्हीए) तर 500 केव्हीए क्षमतेच्या 3 ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती व पाहणी करण्यात आल्याचे हेस्कॉमकडून कळविण्यात आले.