Tarun Bharat

खानापूर-रामनगर महामार्ग दुरुस्तीला प्रारंभ

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्ता दुरुस्त होत असल्यामुळे नागरिकांतून समाधान

वार्ताहर /खानापूर

खानापूर-रामनगर राष्ट्रीय महामार्ग गेल्या दोन-तीन वर्षापासून समस्येच्या विळख्यात सापडला होता. त्यामुळे पावसाळय़ातील प्रवास नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ या महामार्गालगत असलेल्या ग्रामस्थांवर आली होती. पण शिंदोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या पाठ पुराव्याला यश आल्याने रामनगरपर्यंतच्या रस्ता दुरुस्ती कामाला अखेर प्रारंभ झाला. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्ता दुरुस्ती होत असल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 शिंदोली ग्रांम पंचायत तसेच नवीन रस्ता कंपनीचे अभियंता कापसे यांच्या कामाबद्दल प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या पंधरवडय़ापूर्वी पडलेल्या पावसामुळे या महामार्गावरील अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे व चिखलाचे साम्राज्य पसरल्याने दयनीय अवस्था निर्माण झाली होती. महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात शिंदोळी  ग्रां. पं. तर्फे तसेच अनेक कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले होते. तसेच खानापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात जाब विचारून अधिकाऱयांना धारेवर धरले होते.

रस्ता दुरुस्तीची ग्वाही

याची तातडीने संबंधित अधिकाऱयांनी दखल घेतली आणि दुरवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करुन नवीन कंत्राटदाराशी संपर्क साधला. त्यांना रस्त्याच्या दयनीय परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यावेळी तातडीने रस्ता दुरुस्तीची ग्वाही त्यांनी दिली.

आश्वासनाची पूर्तता

रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या रस्ता अभियंता निलेश कापसे यांना शिंदोली ग्रां. पं चे सदस्य प्रा. शंकर गावडा, तालुका ग्रामपंचायत असोसिय्एशनचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, शिंदोळी ग्रामपंचायत अध्यक्ष राजेश पाटील यांनी होनकल ते रामनगरपर्यंतच्या खराब झालेला रस्ता अभियंता निलेश कापसे यांच्या निदर्शनास आणून दिला. तातडीने रस्ता दुरुस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची विनंती केली. याची दखल घेऊन बुधवारी होनकलपासून रामनगरपर्यंतच्या रस्ता दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केला. यामुळे  प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

गणित विषयाच्या पेपरला 269 विद्यार्थ्यांनी मारली दांडी

Patil_p

निपाणी उद्यापासून अंशतः चालू; या सेवा राहणार सुरू

Archana Banage

केएलई डेंटल सायन्सतर्फे मौखिक आरोग्य दिन

Amit Kulkarni

बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी, अर्जुन स्पोर्ट्स संघ विजयी

Amit Kulkarni

अखेर कणबर्गीत झाली पिण्याच्या पाण्याची सोय

Omkar B

रविवारीही शहर परिसरात शांतता

Amit Kulkarni