दिवसभर विमानांची ये-जा असल्याने रात्रीच्यावेळी दुरुस्ती : लवकरच नव्या ढंगात रनवे उपलब्ध होणार
प्रतिनिधी /बेळगाव
सांबरा येथील विमानतळावरील रनवेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रात्रीच्यावेळी विमानांची वाहतूक बंद असते. त्यामुळे रनवे दुरुस्तीचे काम केले जात आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या इंजिनिअरिंग विभागाच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्तीचे काम सुरू आहे.
बेळगाव विमानतळावर दररोज 7 ते 8 विमानांची ये-जा असते. केवळ लहान विमानेच नाही तर आता बोईंग विमानेही विमानतळावर दाखल होत आहेत. त्यामुळे उत्तम पद्धतीचा रनवे असणे आवश्यक आहे. रनवेवर काही ठिकाणी दुरुस्तीची गरज होती. तर काही ठिकाणांच्या रनवेवरील रंगाचे पट्टे पुसट झाले होते. यामुळे विमान लँडिंग होताना वैमानिकाला समस्या येत होत्या. त्यामुळे रनवेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
दिवसभरात विमानांची ये-जा असल्याने रनवे बंद ठेवणे शक्मय नसल्याने रात्रीच्यावेळी दुरुस्तीचे काम सुरू आहे. रनवेवर नवीन डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर त्यावर पांढऱया रंगाचे पट्टे ओढले जात आहेत. त्यामुळे लवकरच नव्या ढंगात रनवे उपलब्ध होणार आहे.