स्थानिक रहिवाशांची हेस्कॉमकडे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी येथील राणाप्रताप रोडहून काँग्रेस रोड कॉर्नरला येताना डाव्याबाजुला विद्युत वाहिन्या धोकादायक स्थितीत आहेत. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे विद्युत वाहिन्या सैल झाल्या असून जोडण्यात आलेल्या खांबापासून त्या दूर जात आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी या वाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी हेस्कॉमकडे करीत आहेत.
काँग्रेस रोड हा वर्दळीचा असून दररोज शेकडो वाहने या परिसरातून ये-जा करतात. वाऱयामुळे विद्युतवाहिन्या सैल झाल्या असून, त्यांची त्वरित दुरुस्ती होणे गरजेचे आहे. एखाद्यावेळी विद्युतवाहिन्या तुटून जमिनीवर कोसळल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्मयता असल्याने त्यापूर्वी विद्युतवाहिन्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.