Tarun Bharat

विद्युतखांब बदलण्याचे काम युद्धपातळीवर

वीजवाहिन्या जोडणी दिवसभर सुरू : सर्वच ठिकाणची दुरुस्ती पूर्ण

प्रतिनिधी /बेळगाव

शहरात वळीव पावसाचा मारा सुरूच असून, दररोज दुपारनंतर चमकणाऱया विजांसह होणाऱया पावसामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. मंगळवारी दुपारी झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळल्यामुळे विद्युत वाहिन्या आणि विद्युत खांबांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. विद्युत खांब बसविण्यासाठी विद्युत वाहिन्या जोडण्याचे काम मंगळवारी सायंकाळपासूनच हाती घेण्यात आले होते. बुधवारी देखील दिवसभर ठिकठिकाणी दुरूस्तीची कामे करण्यात येत होती.

मंगळवारी दुपारी 3 वाजल्यानंतर सुरू झालेल्या वादळी वाऱयासह पावसाचा जोरदार मारा झाला होता. यावेळी ठिकठिकाणी मोठमोठी झाडे कोसळली होती. शहर व्याप्तिमध्ये वस्तीच्या ठिकाणी तसेच प्रमुख रस्त्याशेजारील झाडे विद्युत वाहिन्यांवर कोसळली होती. त्यामुळे विविध भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. विद्युतखांब कोसळल्याने विद्युतपुरवठा बंद ठेवावा लागला. सायंकाळी सहानंतर पावसाचा मारा कमी झाल्यानंतर दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. मात्र मोठमोठी झाडे कोसळलेल्या ठिकाणी विद्युतखांबांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या परिसरातील दुरुस्तीचे काम तातडीने करणे अशक्मय होते. केवळ झाडे हटवून काही ठराविक भागाचा विद्युतपुरवठा बंद ठेवून अन्य ठिकाणी विजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

हेस्कॉमला मोठय़ा प्रमाणात फटका

यंदा वळीव पावसामुळे हेस्कॉमला मोठय़ा प्रमाणात फटका बसला असून, मंगळवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या तुटल्या होत्या. त्यामुळे रात्रभर विद्युतपुरवठा बंद ठेवावा लागल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. बुधवारी सकाळपासूनच दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली होती. विद्युतवाहिन्या जोडण्यांसह मोडकळीस आलेले विद्युतखांब बदलण्यात आले. विश्वेश्वरय्यानगर येथील पीडब्लूडी क्वॉर्टर्स परिसरात झाड कोसळल्याने विद्युतखांब मोडकळीस आला होता. अशा सर्वच ठिकाणचे विद्युतखांब बुधवारी बदलण्यात आले. ही कामे बुधवारी दिवसभर सुरू होती.

Related Stories

रानडे रोडचे काम पूर्ण करण्याची मागणी

Amit Kulkarni

कपिलेश्वर मंदिरात कार्तिकी एकादशी साजरी

Amit Kulkarni

साई मंदिर गाळय़ांमधील अतिक्रमण हटविले

Amit Kulkarni

मीटर रिडरने ग्राहकांना लावला चुना

Patil_p

इतरांचा दुःस्वास करून स्वभाषेचा विकास अशक्य

Amit Kulkarni

अखेर कत्तलखान्याला लागले टाळे

Patil_p