प्रतिनिधी/ पणजी
तृतीय वित्त आयोगाने शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आपला अंतिम सखोल अहवाल सादर केला.
आयोगाचे अध्यक्ष दौलत हवालदार यांच्या सोबत त्यावेळी गोवा नियोजन आणि सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी, या अहवालाच्या माध्यमातून राज्यातील लोकांना प्रभावी सेवा पोहोचविणे तसेच ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्यास मदत मिळणार असल्याचे सांगितले. या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी सरकार वचनबद्ध असेल, असेही ते म्हणाले.