प्रतिनिधी / बेळगाव : किल्ला येथे बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने किल्ला येथील प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याचे वृत्त समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाले. परंतु हे वृत्त पूर्णपणे चुकीचे व कोणताही आधार नसलेले होते. बुधवारी सकाळपासून या ठिकाणी सुरळीत पद्धतीने वाहतूक सुरु होती. त्यामुळे कोणीही घाबरून जावू नये, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले. मंगळवारी दुचाकीचा अपघात झाल्याने याठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने बंद करण्यात आली होती. परंतु चुकीच्या वृत्तामुळे किल्ला परिसरात दहशत पसरली. परंतु हे वृत्त चुकीचे असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
Trending
- देशात तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान
- सुर्याचे नाबाद शतक, मुंबईचा धमाकेदार विजय
- अदानी समूह करणार फिलिपिन्समध्ये गुंतवणूक
- सुनीता विल्यम्सची आज तिसरी अंतराळझेप
- राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज दिल्ली कॅपिटल्सला विजय गरजेचा
- राज्यातील 227 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतदानयंत्रात ‘बंद’
- मतदानाचा तिसरा टप्पा
- आत्मिक बळाचे सामर्थ्य मोठे असते