प्रतिनिधी/ बेळगाव
माजी सैनिक संघटना बेळगावतर्फे 74 वा प्रजासत्ताक दिन माजी सैनिक संघटनेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. सचिव सुभेदार गंगाराम गवस यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अध्यक्ष सुभेदार के. बी. नौकुडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शौर्य चौकातील सैनिक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व हुतात्मा जवानांप्रती दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अध्यक्ष सुभेदार के. बी. नौकुडकर यांनी मनोगत व्यक्त केले व अधिकाधिक माजी सैनिकांनी संघटनेचे सदस्यत्व घेऊन संघटनेमध्ये उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी संघटनेमध्ये कार्यरत सुरेश अतवाडकर, शिक्षिका स्वाती देसाई, संगणक प्रशिक्षक सचिन कांबळे यांना पुष्पगुच्छ व उपहार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी, उपाध्यक्ष ऑ. कॅप्टन नारायण पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभेदार मेजर बाळकृष्ण गावडे यांनी केले. ऑ. कॅप्टन लक्ष्मण मुंगारे यांनी आभार मानले.