प्रतिनिधी /खानापूर
बेळगाव आणि खानापूर तालुक्यात 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. खानापूर शहर आणि परिसरात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमाने साजरा केला. या निमित्त सकाळी सर्व शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, सोसायट्या, विविध संघ संस्था आदी ठिकाणी ध्वजारोहण केले. खानापूर येथील मलप्रभा मैदानावर झालेल्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण तहसीलदार व्ही. एम. गोठेकर यांनी केले. अध्यक्षस्थानी आमदार अंजली निंबाळकर होत्या.
यावेळी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, काँग्रेसचे चंब्बाण्णा होसमनी, नगराध्यक्ष नारायण मयेकर, नगरसेवकांसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांच्या मुला-मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
माजी सैनिक मल्टिपर्पज सोसायटी
येथील माजी सैनिक मल्टिपर्पज सोसायटीच्या कार्यालयात जयराम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. प्रमुख पाहुणे म्हणून राजाराम पाटील, मारुती गुरव, लक्ष्मण पाटीलसह सदस्य उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल, गोजगे
बेळगाव : गोजगे येथील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल गोजगे येथे प्रजासत्ताक दिन साजरा केला. ध्वजपूजन माजी विद्यार्थिनी बेबीताई मेलगे यांनी तर ध्वजारोहण मुख्याध्यापक एस. व्ही. जाधव यांनी केले. विद्यार्थ्यांची भाषणे झाली. उमेश चलवेटकर व बेबीताई मेलगे यांच्यावतीने दरवर्षी दहावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जातात. त्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.
श्री चांगळेश्वरी हायस्कूल
येळ्ळूर : श्री चांगळेश्वरी हायस्कूल व श्री चांगळेश्वरी लोअर व हायर प्रायमरी स्कूलमध्ये संस्थापक वाय. एन. मजुकर यांनी ध्वजारोहण केले. संचालक चंद्रकांत हणमंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि रामदास धुळजी यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन केले. सचिव प्रसाद मजुकर व इतर उपस्थित होते. वाय. एन. मजुकर, चेतन हुंदरे, प्रसाद मजुकर आणि विद्यार्थ्यांनी भाषणे केली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व नृत्य सादर केले. माजी विद्यार्थी किरण टक्केकर यांनी शाळेला सूक्ष्मदर्शक यंत्र भेट दिले.
कडोली शिवाजी हायस्कूल
कडोली : कडोली येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये अण्णू कटांबळे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन वाय. एस. चौगुले यांनी केले. ध्वजपूजन सल्लागार समितीचे अध्यक्ष एम. डी. चौगुले यांनी केले. एन. एल. पाटील यांनी ध्वजारोहण केले. शाळेत जुनी नाणी आणि जुन्या नोटांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
चापगाव मलप्रभा हायस्कूल
खानापूर : चापगाव येथील मलप्रभा हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त चांगापा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा स्नेहल पाटील, सदस्य नागराज यळ्ळूरकर, माऊती चोपडे, रमेश धबाले, पीडीओ हणमंत पाटील, मुख्याध्यापक व्ही. बी. होसूर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी निवृत्त पॅप्टन चांगापा पाटील, भारतीय सैन्यात सेवा बजावत असलेले राहुल धबाले व परशराम चोपडे यांचा हायस्कूलतर्फे सत्कार केला. यावेळी पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी चांगापा पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे स्वखर्चाने वितरण केले.
येळ्ळूर ग्राम पंचायत
येळ्ळूर : येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये अध्यक्ष सतीश बा. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आंबेडकर चौक येळ्ळूर याठिकाणी ग्राम पंचायत उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य सदस्या, कर्मचारी, दलित संघटनेचे कार्यकर्ते, शिक्षक, अंगणवाडी शिक्षिका, विद्यार्थी व श्री शिवाजी विद्यालयाचे कॅडेट व येळ्ळूरवाडी शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक उपस्थित होते.
अष्टे प्राथमिक कृषी पतीन संघ
किणये : अष्टे चंदगड येथील प्राथमिक कृषी पतीन संघ येथे संघटनेचे अध्यक्ष परशराम चौगुले, उपाध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मल्लाप्पा पाटील, दुर्गाप्पा पाटील, पिराजी शिंदे, सुलोचना, सुनीता पाटील, राजू पाटील, शंकर कडेमणी उपस्थित होते.
अष्टे जय जवान माजी सैनिक संघटना
किणये : अष्टे (चंदगड ) येथील जय जवान माजी सैनिक संघटनेतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा केला. संस्थापक एन. डी. लाड यांनी ध्वजारोहण केले. महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन लक्ष्मण हुंदरे यांनी केले. स्वागत सचिव सुरेश लोहार यांनी केले. यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
श्री ब्रह्मलिंग मल्टिपर्पज को ऑफ सोसायटी येळ्ळूर
येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री ब्रह्मलिंग मल्टिपर्पज को ऑफ क्रेडिट सोसायटीत प्रजासत्ताक दिन साजरा केला. कार्यक्रमाला सोसायटीचे संस्थापक श्री गोविंद सिद्धाप्पा कालसेकर, चेअरमन जोतिबा गोविंद कालसेकर, व्हाईस चेअरमन प्रकाश नागेंद्र सायनेकर उपस्थित होते. या प्रसंगी सोसायटीचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
बसरीकट्टी महालक्ष्मी हायस्कूल
बेळगाव : बसरीकट्टी येथील श्री महालक्ष्मी हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला. अध्यक्षस्थानी मारुती आम्मेंनगी होते. डॉ. बाबासाहेब प्रतिमेचे पूजन परशराम शेरेकर, म. गांधीजीच्या प्रतिमेचे पूजन शिवाजी सांबरेकर यांनी केले. ध्वजारोहण शिवाजी कोंडसकोप यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर एसडीएमसी सदस्य व मान्यवर उपस्थित होते.