Tarun Bharat

RBI चे पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये पुन्हा वाढ

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India) पतधोरण बैठकीनंतर आज जाहीर झाले आहे. यामध्ये आरबीआय पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआय ने रेपो दरात ०.५० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)चे पतधोरण आज जाहीर झाले. रेपो दरात ०.५० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी घोषणा केली आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे.

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर,”जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”

रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात ५० बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. यामुळे ०.५० टक्क्यांनी व्याजदर वाढले आहेत. आजच्या वाढीसह आरबीआयने मे महिन्यापासून रेपो दरात चार वेळा वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर आता ५.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. पूर्वी ते ५.४० होता. शक्तिकांत दास म्हणाले की, कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक मध्यवर्ती बँकांच्या आर्थिक धोरणांमुळे व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. आधीच महागाई उच्चांकावर असून त्यात अजून भर पडली आहे.

Related Stories

ऑक्सिजनचं संकट दूर करा, लोक मरत आहेत; दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

Archana Banage

पाकिस्तानी ड्रोनची पुन्हा घुसखोरी

Patil_p

ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका; १२ आमदारांचं निलंबन रद्द

Archana Banage

देशात आज एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

datta jadhav

ममता बॅनर्जी ‘या’ तारखेला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Archana Banage

पुण्यात पुढील 7 दिवसांसाठी मिनी लॉकडाऊन! दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी

Tousif Mujawar
error: Content is protected !!