Tarun Bharat

रिझर्व्ह बँकेचा ‘डिजिटल रुपया’ 1 डिसेंबरला येणार

बँकेकडून अधिकृत घोषणा, प्रायोगिक तत्वावर होणार प्रारंभ

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय रिझर्व्ह बँकेचे इलेक्ट्रॉनिक चलन ‘डिजिटल रुपया’ 1 डिसेंबरपासून येणार आहे. ही घोषणा बँकेकडून मंगळवारी करण्यात आली. हा डिजिटल रुपया एका डिजिटल टोकनच्या स्वरुपात असेल आणि ते अधिकृत चलन असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. या डिजिटल चलनाचा प्रारंभ प्रयोगिक तत्वावर होणार असून त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून नंतर पुढचे निर्णय घेतले जाणार आहेत.

प्रारंभीच्या काळात या चलनाची उपलब्धता केवळ निवडक उपयोगकर्त्यांपुरतीच मर्यादित राहणार आहे. या निवडक उपयोगकर्त्यांमध्ये काही ग्राहक आणि काही व्यापारी यांचा समावेश असेल. सध्या ज्या किमतीच्या नोटा आणि नाणी आहेत, त्याच किमतींमध्ये हे नवे डिजिटल चलन वितरीत करण्यात येणार आहे. हे चलन उपयोगकर्त्यांना डिजिटल वॅलेटच्या स्वरुपात काही निवडक बँकांमधून उपलब्ध होणार आहे. हे चलन मोबाईल फोन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये साठविता येणार आहे. या चलनाचे व्यवहार ‘व्यक्ती ते व्यक्ती’ (पी टू पी) आणि ‘व्यक्ती ते व्यापारी’ (पी टू एम) अशा दोन्ही प्रकारे करण्यात येऊ शकणार आहेत. व्यापाऱयांना या चलनातून पैसे द्यायचे असल्यास ते क्यूआर कोडच्या माध्यमातून देता येतील. हे क्यूआर कोड व्यापाऱयांनी प्रदर्शित करायचे आहेत.

अर्थसंकल्पातील आश्वासन पूर्ण

गेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिजिटल रुपया आणला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता हे चलन बाजारात येत आहे. याला ग्राहक आणि व्यापारी यांचा प्रतिसाद कसा मिळतो, याची पाहणी करुन या चलनाचा विस्तार करण्याची योजना आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

डिजिटल रुपया म्हणजे काय ?

ड डिजिटल रुपया डिजिटल स्वरुपातील चलन असून ते रिझर्व्ह बँकेकडून वितरीत केले जाणार. ते नेहमीच्या नोटांच्याच किमतीचे असणार

ड त्याचा उपयोग आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात येणार. ते डिजिटल टोकनच्या स्वरुपात मिळणार. त्याची साठवणूक मोबाईल केली जाऊ शकणार

आठ बँकांमध्ये मिळणार

या चलनाचे वितरण करण्यासाठी केंद्र सरकारने आठ बँकांची निवड प्रारंभ म्हणून केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी या चार बँकांमध्ये ते प्रथम उपलब्ध होईल. नंतर बँक ऑफ बरोडा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक या चार बँकांमध्ये ते नंतरच्या टप्प्यात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

Related Stories

कोरोनावरील स्वदेशी 2DG औषध लवकरच बाजारात

datta jadhav

दैनंदिन संक्रमितांचा आकडा 50 हजारांखाली

datta jadhav

‘निकटचा स्पर्श’ प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

Patil_p

पाकिस्तानात शीखांवर त्याचार, भारताकडून निषेध

Patil_p

एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ

Archana Banage

चालू वर्षात अनेक राष्ट्रप्रमुख येणार भारतात

Patil_p