नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायालयाने अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी आप नेते मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर निर्णय राखून ठेवला आहे. सिसोदिया यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने सिसोदिया यांची जामीन याचिका फेटाळली होती. सिसोदिया हे प्रभावशाली व्यक्ती असल्याने जामीन मिळाल्यास पुराव्यांसोबत छेडछाड करू शकतात असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.