Tarun Bharat

नैतिकता शिल्लक असल्यास राजीनामा द्या !

राजद नेत्याचा नितीश कुमारांना सल्ला

वृत्तसंस्था/ पाटणा

कुढनी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून पराभव पत्करावा लागल्यावर महाआघाडीतील मतभेद पुन्हा उफाळून आले आहेत. राजद नेते आणि कुढनीचे माजी आमदार अनिल कुमार सहनी यांनी संजद नेते आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांना या पराभवासाठी जबाबदार धरले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘नैतिकतेच्या आधारावर’ राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. कुढनीत महाआघाडीचा नव्हे तर नितीश कुमार यांचा पराभव झाला आहे. संजदच्या उमेदवाराला उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यामुळे मते प्राप्त झाली आहेत. कुढनीच्या जनतेने नितीश कुमार यांना धडा शिकविला आहे. किंचित नैतिकता शिल्लक असल्यास नितीश कुमार यांनी राजीनामा देत तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपद सोपवावे असे अनिल सहनी यांनी म्हटले आहे.

Related Stories

पेट्रोलियम कंपन्यांना 22 हजार कोटी देणार

Patil_p

सायबर बुलिंग व ग्रुमिंग – एक वाढता धोका

Patil_p

अतिवृष्टीमुळे तामिळनाडूतील जनजीवन बेहाल

Amit Kulkarni

अल्पवयीन युवतीवर दिल्लीत ऍसिडहल्ला

Patil_p

मुसेवाला हत्येप्रकरणी दोन शार्पशूटर्सना अटक

Patil_p

राज्य मंत्रिमंडळ विस्तार आज

Patil_p