बेळगाव : मराठा मंडळतर्फे नुकतीच नाथाजीराव हलगेकर स्मृती चषक वक्तृत्व स्पर्धा पार पडली. यंदा आंतरशालेय विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेबरोबरच अध्यक्षा राजश्री नागराजू यांनी मराठा मंडळ शिक्षण संस्था मर्यादित वक्तृत्व स्पर्धा घेतली. स्पर्धेचे उद्घाटन चव्हाट गल्ली येथील मंडळाच्या भातकांडे सभागृहात दिनकरराव ओऊळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी नाथाजीराव हलगेकर यांच्या कार्याची प्रशंसा केली. शनिवारी शिक्षकांची वक्तृत्व स्पर्धा झाली. त्यामध्ये 52 शिक्षकांनी सहभाग घेतला. रविवारी विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यावेळी परीक्षक म्हणून आरती आपटे, ईश्वर पाटील व मारुती तमुचे यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी मुख्याध्यापक व्ही. बी. देसाई, प्राचार्य एस. एस. पाटील, उपप्राचार्य एल. एन. शिंदे, मुख्याध्यापक व्ही. ए. हसबे यांनी परिश्रम घेतले. मंडळाचे सचिव भाऊ पाटील व कार्यालयीन व्यवस्थापक एल. व्ही. मण्णूरकर यांचे स्पर्धेसाठी सहकार्य लाभले.
Previous Articleवैश्यवाणी समाजातर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.