प्रतिनिधी/ पणजी
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. पुरसकृत, सांखळी येथील बिल्वदल व इन्स्टिटयुट मिनेझिस ब्रागांझा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल गोवा पातळीवरील सवेश नाटय़गीत सादरीकरण स्पर्धेच्या निवड चाचणी फ्sढरी स्पर्धकांच्या उत्स्फ्gढर्त सहभागाने पार पडली.
पणजीतील आयएमबी सभागृहात ‘सवेश नाटय़गीत गायन स्पर्धा 22’ या नाटय़गीत गायन स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण 34 स्पर्धकांनी भाग घेतला होता. अंतिम स्पर्धा सवेश साभिनय नाटय़गीतांच्या गायनाचा कार्यक्रम रविवार दि. 14 ऑगस्ट रोजी सांखळी येथील रवींद भवन नाटय़गृहात होणार आहे. स्पर्धेतील अंतिम फ्sढरीत निवड झालेल्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील.
मराठी रंगभूमीवर गाजलेल्या ‘स्वयंवर, सौभद्र, मानापमान, ययाती-देवयानी, कटय़ार काळजात घुसली, संशय कल्ल़ोळ, संत गोरा कुंभार अशा विविध संगीत नाटकातील विविध राग रागिन्यातील विविध्यपूर्ण नाटय़पदे स्पर्धकांनी सादर करून या चाचणी फ्sढरीत रंग भरला. स्पर्धेत युवक, युवती तसेच बाल स्पर्धकांनी मोठा रस दाखविला.
तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन लोकमान्य मल्टिर्पपज को-ऑप. सोसायटी लि.च्या संचालिका सई ठाकूर बिजलानी यांच्या हस्ते समई प्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर आयएमबीचे उपाध्यक्ष गोरख मांद्रेकर, लोकमान्यचे उत्तर गोवा व्यवस्थपक कुमार प्रियोळकर, परीक्षक पं. चंद्रकांत वेर्णेकर, बिल्वदलचे म. कृ. पाटील, हार्मोनियमवादक प्रदीप शिलकर, तबलावादक दत्तराज शेटये, दै. तरुण भारत गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर, वितरण व्यवस्थापक शंकर जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले. सागर जावडेकर यांनी स्वागत करून आभार मानले.
स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक पुढील प्रमाणे ः आशीष पुनो नाईक, हर्षा मनोज गणपुले, अंसिका चांगदेव नाईक, पांडुरंग तुकाराम परब, कविता कैलास देसाई, उर्वी उदय फ्ढडके, दत्तगुरू मोरेश्वर केळकर, सुजाता सुनील काळे, प्रणव प्रदीप गांवस, लता महेश गांवस, दत्तू जी. गांवस, मिनल दामोदर कामत, चिन्मयी दामोदर कामत (सर्व सांखळी), अनुष्का सुजीत थळी (चोडण), सिध्दी मळीक व संजित संदीप मणेरीकर (पर्वरी), सदानंद गोकुळदास जो (सांताप्रुज), सिध्दी सोमनाथ पार्सेकर (मांद्रे), लक्ष्मी पांडुरंग महात्मे (पणजी), पांडुरंग हरिश्चंद्र नाईक (म्हार्दोळ), आर्या अविनाश मणेरीकर (कोलवाळ), सूरज नारायण शेटगांवकर (मोरजी), गार्गी जगदीश शिरोडकर (बोरी), योगिता प्रल्हाद सतरकर (निरंकार), श्रुती आनंद सालेलकर (बेतोडा), प्रवीण शिलकर (माशेल), श्रीजा गौरीश फ्ढडते (तिस्क फ्ढाsंडा), दत्तप्रसाद गांवस (धारबांदोडा), श्रुती मणेरीकर बोरकर व श्रवण मणेरीकर (बोरी), संदेश विनायक हळर्णकर (रूमड पाळी), आर्या अभिषेकी, ऋषीकेश नितीन ढवळीकर (कवळे) व साक्षी स्वप्नील देसाई (फ्ढाsंडा).