Tarun Bharat

चोपडेतील खाजन पूर्ववत करा

राष्ट्रीय हरित लवादाचा सीआरझेडएमला आदेश

प्रतिनिधी /पणजी

चोपडे-पेडणे येथील भराव टाकण्यात आलेली खाजन जमीन पूर्ववत करा, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाला दिला आहे. तक्रारदार सावियो रॉड्रिग्स यांनी लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर लवादाने हा निवाडा दिला आहे.

चोपडे गावातील सर्व्हे क्र. 25/18 मधील जमीन बेकायदेशीरपणे दावा करून त्यात भराव टाकण्यात आला होता. सदर जमीन शापोरा नदीच्या तीरावर असून तो भाग जैव-संवेदनशील आहे, असे याचिकादाराने निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे त्या भागात पूर येण्याचा धोका असून किनारी नियंत्रण विभागाच्या (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या प्रकरणी प्राधिकरणाने कारवाई करण्याची गरज होती आणि ती जमीन पूर्ववत करण्याचे काम प्राधिकरणाने करायला हवे होते, असे निरीक्षण लवादाने नोंदवले आहे. त्या जागेची पाहणी करण्यात आली होती आणि ती बेकायेदशीरपणे बळकावल्याचे समोर आले होते. तरीदेखील प्राधिकरणाने कारवाई केली नाही. या प्रकरणी प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. परंतु तिची दखल घेण्यात आली नाही, असे लवादाने निवाडय़ात म्हटले आहे. ती जागा दोन महिन्यांत पूर्ववत स्थितीत आणावी आणि ती बळकावलेल्यांकडून पर्यावरण भरपाई वसूल करण्यात यावी, असे लवादाने आदेशातून नमूद केले आहे.

Related Stories

पर्यावरणीय अनुभवाचे विद्यापीठ म्हणजेच राजेंद्र केरकर

Amit Kulkarni

काँग्रेसकडून उद्या म्हापशात ‘महागाईचा नरकासुर वध’ आंदोलन

Amit Kulkarni

मुख्यमंत्रीपदी डॉ. प्रमोद सावंत?

Amit Kulkarni

कुठ्ठाळीत अपक्ष अँन्थनी वास जिंकणार की उमेदवारांच्या गर्दीत चमत्कार घडणार

Patil_p

सुरश्री केसरबाई केरकर संगीत संमेलनाची सूरस मैफलींनी यादगार सांगता

Amit Kulkarni

अट्टहासापोटी लोकांमध्ये तेढ निर्माण करू नये

Omkar B