डेसकोडचे पालन करण्याचा शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांचा आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे पीयुसी द्वितीय परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच परिक्षेसाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांनासुद्धा परिक्षेदरम्यान डेसकोडचे पालन करण्याचे आदेश शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिले आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
राज्यात यापूर्वी शिक्षकांना डेसकोड नव्हता. पण यावषीपासून राज्यातील शिक्षकांसाठी परीक्षा काळात त्यांना धार्मिक पोषाखापासून दूर राहण्यास पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे सूचित केले आहे. पत्रकार परिषदेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी अनेक महाविद्यालयांनी शिक्षकांना धार्मिक पोषाख घालण्यापासून प्रतिबंध करण्याची विनंती सरकारकडे केली आहे. सरकारने शिक्षकांसाठी कोणताही डेसकोड निर्धारित केलेला नाही. परंतु काही महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर शिक्षकांना डेसकोड केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर विद्यार्थ्यांना धार्मिक पोषाख घालण्याची परवानगी नसेल तर शिक्षकांनी तो नियम पाळणे हा त्यांचा नैतिक अधिकार आहे. परीक्षा केंद्रात शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही धार्मिक पोशाख वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच आमच्याकडे कोणत्याही विद्यार्थ्याने हिजाब घालण्यासाठी परवानगी मागितलेली नाही. त्यामुळेच प्रत्येकाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. यावषी पीयुसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेला 6,84,225 विद्यार्थी बसणार आहेत. त्यापैकी 6,00,519 नियमित तर 61 परत बसणारे व 21,928 खासगी विद्यार्थी आहेत. राज्यात एकूण 1070 केंदांमधून परीक्षा होणार आहे. दक्षिण बेंगळूरमध्ये सर्वाधिक 83 परीक्षा केंद्रे आहेत. रामदुर्गमध्ये सर्वात कमी म्हणजे 13 परीक्षा केंदे आहेत.
या परीक्षा एका सुरक्षित प्रणाली अंतर्गत घेण्यात येणार आहेत. गैरप्रकार थांबविण्यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. विभागाने अधिकार क्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशनमधील अधिकाऱयांची बैठक बोलावण्यात आली आहे. मागील वषी प्रश्नपत्रिका फुटल्याबद्दल चर्चा करून अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले आहे. सीसीटीव्हीद्वारे परीक्षेदरम्यान परीक्षा केंदे त्याचप्रमाणे सरकारी कार्यालय येथेही सर्व हालचालींवर लक्ष ठेवणार आहे, असे मंत्री नागेश यांनी माहिती दिली.