प्रतिनिधी /बेंगळूर
यापुढे सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना फोटो आणि व्हिडिओ काढण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने शुक्रवारी अधिकृत आदेश जारी केला आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या कोणत्याही खात्याच्या कार्यालयात नागरिकांना अनधिकृतपणे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास मनाई केली आहे.
काही खासगी व्यक्ती सरकारी कार्यालयीन वेळेत येऊन फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यामुळे अशा फोटो-व्हिडिओचा गैरवापर करून खाते आणि सरकारच्या प्रति÷sला धक्का पोहोचत आहे. तसेच महिला कर्मचाऱयांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, राज्य सरकारच्या सर्व खात्याच्या कार्यालयीन वेळेत नागरिकांना फोटो आणि व्हिडिओ काढण्यास बंदी घालावी, अशी विनंती कर्नाटक राज्य कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांनी राज्य सरकारकडे निवेदन सादर करून केली होती.
या विनंतीची दखल घेत राज्यपालांच्या आदेशानुसार सरकारी कार्यालयात नागरिकांना फोटो-व्हिडिओ काढण्यावर निर्बंध घालण्याचा आदेश कर्मचारी व प्रशासन सुधारणा खात्याचे सचिव के. वेंकटेशप्पा यांनी जारी केला आहे. तसेच या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. उल्लंघन करणाऱयांवर कोणत्या प्रकारची कारवाई होणार याचा उल्लेख आदेशात केलेला नाही.