दुरुस्तीमुळे सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत राहणार बंद
बेळगाव : रेल्वे सुरळीत व सुरक्षितपणे धावण्यासाठी दुसऱ्या रेल्वेगेटजवळील रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येत आहे. या कारणास्तव रविवार दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत या रेल्वेगेटमधून होणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पर्यायी मार्गे वाहने वळविण्यात येणार असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे रेल्वेखात्याने पत्रकाद्वारे कळविले आहे.