Tarun Bharat

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अंतिम उत्तरसूचीच्या आधारे

पुणे / प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) या परीक्षेच्या इयत्तानिहाय तसेच पेपरनिहाय जाहीर करण्यात आलेल्या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येणार आहे.

उत्तरसूची www.mscepune.in, https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे.

अधिक वाचा : न्हावाशेवा बंदरावर 1725 कोटींचे हेरॉईन जप्त

Related Stories

शरद पवारांनी बोलवली राष्ट्रवादी नेत्यांची बैठक

Archana Banage

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांबरोबर आज महत्वपूर्ण बैठक

Archana Banage

पोलिसांनी आरोग्य व आहाराकडे लक्ष देणे गरजेचे : डॉ.मोहन आगाशे

Tousif Mujawar

सोलापूर शहरात 91 रुग्ण कोरोनामुक्त, 54 नवे पॉझिटिव्ह

Archana Banage

कोल्हापूर : पेईंग गेस्टनेच केली रोकड व दागिण्यांची चोरी

Archana Banage

7 years of PM Modi : आजही काँग्रेस सरकारनं केलेल्या कामगिरीच्याच बळावर देशाचा कारभार सुरु – संजय राऊत

Archana Banage