Tarun Bharat

कर्नाटकातील एसएसएलसीचा निकाल जाहीर

Advertisements

राज्यातील एकूण निकाल 85.53 टक्के : विजापूरचा अमित मदार राज्यात पहिला : बेळगाव आणि चिकोडी जिल्हा ए ग्रेड मध्ये

प्रतिनिधी /बेंगळूर

विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्त्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या राज्यातील एसएसएलसी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. संपूर्ण राज्याचा निकाल 85.53% लागला. शिक्षणमंत्री बी.सी.नागेश यांनी बेंगळूर येथे पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. राज्यातील एकूण 8 लाख 53 हजार 436 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामधील 7 लाख 70 हजार 81 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 3 लाख 58 हजार 602 विद्यार्थी तर तीन लाख 72 हजार 179 विद्यार्थिनींचा समावेश आहे.एकूण 81.30% विद्यार्थी तर 90.29 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. निकालात बेळगाव आणि चिकोडी जिल्ह्याचा ए ग्रेड मध्ये समावेश आहे. राज्यात १४५ विद्यार्थ्यांनी 625 पैकी 625 गुण प्राप्त केले आहेत.

Related Stories

नाला स्वच्छतेकडे मनपा अधिकाऱयांचा कानाडोळा

Amit Kulkarni

बाळकृष्ण नगरमधील रस्ता-गटार बांधकामाकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

‘लोकमान्य’कडून सामाजिक बांधिलकीचीही जपवणूक

Amit Kulkarni

सरकारी-खासगी क्षेत्रातील स्वच्छता कामगारांचे होणार सर्वेक्षण

Patil_p

लग्न सोहळय़ांच्या परवानगीसाठी तहसीलदार कार्यालयात गर्दी

Amit Kulkarni

वडिलांच्या नोकरीवर विवाहित मुलीचाही हक्क

Patil_p
error: Content is protected !!