आचरा / प्रतिनिधी –
आचरा ग्रामपंचायत अंतर्गत निबंध, चित्रकला, वक्तृव, व कनिष्ठ महाविद्यालय माझा गाव माझ्या विकासाच्या कल्पना या विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . यांचे निकाल जाहीर झाले असून विजेत्यांना ग्रामपंचायत आचरा मार्फत गौरविण्यात आले यावेळी आचरा सरपंच प्रणया टेमकर, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, सुरेश गावकर, उद्योजक जयप्रकाश परुळेकर, सर्व सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे -निबंध स्पर्धा (विषय – मासा गाव माझ्या विकासाच्या कल्पना) प्रथम क्रमांक सिद्धी संतोष अपराज, द्वितीय क्रमांक सुरभी दिपक त्रिंबककर, तृतीय क्रमांक मयुरेश अनिल शिर्सेकर. चित्रकला स्पर्धा निकाल- प्रथम वेदांत सचिन तवटें (आचरा हायस्कूल), द्वितीय जीवन संतोष मेस्त्री (हिर्लेवाडी शाळा) , तृतीय भार्गवी प्रकाश महाभोज(आचरा हायस्कूल). वक्तृत्व स्पर्धा निकाल- प्रथम सई अंकुशराव घुटूकडे (आचरा हायस्कूल), द्वितीय स्नेहल मंदार घाडी केंद्रशाळा, तृतीय मयुरेश विद्यानंद धुरी(पिरावाडी शाळा ), निबंध स्पर्धा निकाल- प्रथम श्रावणी गंगाराम पोटधन (पिरावाडी), द्वितीय नुर्वी गिरीश शेटये, तृतीय नमिता सुदर्शन वस्ते .