Tarun Bharat

कोलकाता-हैदराबाद आज चुरशीचा सामना

Advertisements

वृत्तसंस्था/मुंबई

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी येथे होणाऱया साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा संघ कोलकाता नाईट रायडर्सचे कडवे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाच्या या स्पर्धेतील मोहिमेला डळमळीत सुरूवात झाल्यानंतर त्यांनी चेन्नई आणि गुजरात संघावर पाठोपाठ विजय मिळविले आहेत. आता हैदराबाद संघ शुक्रवारचा सामना जिंकून विजयाची हॅट्ट्रीक नोंदविण्यासाठी सज्ज झाला आहे. पण या सामन्यात हैदराबाद संघाला वॉशिंग्टन सुंदरची उणीव निश्चित भासेल. अष्टपैलू सुंदरला दुखापत झाल्याने तो या सामन्यात खेळू शकणार नाही. वॉशिंग्टनने यापूर्वीच्या सामन्यात फलंदाजीत आणि गोलंदाजीतही उपयुक्त कामगिरी केली आहे. त्याने फलंदाजीत अर्धशतक झळकविले तर गोलंदाजीत चार बळी या हंगामात मिळविले आहेत. आता वॉशिंग्टन सुंदरच्या जागी श्रेयस गोपाल तसेच जगदीश सुचीत त्याचप्रमाणे अब्दुल समद यापैकी एकाला संधी दिली जाईल. गेल्या दोन सामन्यांमध्ये कर्णधार विल्यम्सन आणि अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीने फलंदाजीत सातत्य राखले आहे. शर्माने 75 आणि 42 तर विल्यम्सनने 32 आणि 57 धावा जमविल्या आहेत. निकेलास पुरन, मॅरक्रम, राहुल त्रिपाठी हे या संघातील उपयुक्त फलंदाज आहेत. जान्सेन, श्रेयस गोपाल, टी. नटराजन, भुवनेश्वरकुमार यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहील.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने या स्पर्धेत पाच सामन्यांतून 6 गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघाला दिल्लीविरूद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. ऍरॉन फेंच, अजिंक्य रहाणे, नितीश राणा हे कोलकाता संघातील प्रमुख फलंदाज आहेत. मात्र रहाणे फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, सुनील  नरेन, उमेश यादव व टीम साऊदी यांच्यावर कोलकाता संघाची गोलंदाजीची भिस्त राहील.

संभाव्य संघ

सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मॅरक्रम, निकोलस पूरन, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, आर. समर्थ, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रोमारिओ शेफर्ड, मार्को जान्सेन, जु. सुचित, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन ऍबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फझलहक फारूकी, उमरान मलिक, टी. नटराजन.

कोलकाता नाईट रायडस& : श्रेयस अय्यर (कर्णधार), ऍरोन फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजित, नितिश राणा, प्रथम सिंग, रिंकू सिंग, अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिख दार, शिवम मावी, टिम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, चमिक करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून.

Related Stories

नेमबाजीत मनीषला ‘सुवर्ण’; तर सिंघराजची ‘रौप्य’पदकाची कमाई

datta jadhav

कसोटी मालिका विजयासाठी सर्वोत्तम कामगिरीची गरज

Omkar B

जगातील सर्वात वयस्कर महिलेची टॉर्च रिलेतून माघार

Patil_p

दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचा जिममध्ये सराव

Patil_p

युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईला टी-20 पदार्पणाची संधी

Amit Kulkarni

विजयाने सांगता करण्यास भारतीय संघ उत्सुक

Patil_p
error: Content is protected !!