वाहन विप्रेती संघटना फाडाची माहिती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतामधील वाहनांची किरकोळ विक्री ही 37 टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढ मागील वर्षात एप्रिल महिन्याच्या तुलनेत आहे. ज्यामध्ये देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु होती, अशी माहिती वाहन डिलर संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन (फाडा) यांनी दिली आहे.
फाडाने म्हटले आहे, की एप्रिलमध्ये सर्व प्रकारांमधील एकूण वाहनांची विक्री झाली ज्यामध्ये एक वर्षाच्या समान कालावधीच्या दरम्यान 11,87,771 वाहन विक्री झाली आहे. वर्षाच्या आधारे पाहिल्यास प्रवासी वाहन आणि दुचाकीसह अन्य सर्व प्रकारातील वाहनांची विक्री मागील वर्षाच्या एप्रिलच्या तुलनेत चालू वर्षात वाढली आहे.
अन्य नोंदी……
- मागील महिन्यात 2,64,342 प्रवासी वाहनांची नोंद
- एक वर्ष अगोदर समान कालावधीत 2,10,682 शाखांमधून 25 टक्के अधिक
- एप्रिल 2022 मध्ये 11,94,520 दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे.
- मागील महिन्यात वाणिज्य वाहनांची किरकोळ विक्री 78,398 वर पोहोचली