फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनची प्रतिक्रिया
नवी दिल्ली
प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत मे 2022 मध्ये वाढ झाली आहे. परंतु दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत सध्या कोविडच्या अगोदरच्या महिन्यात म्हणजे मे 2019 च्या तुलनेत ही विक्री कमीच राहिली आहे. मे महिन्यात एकूण किरकोळ वाहन विक्री 16,46,773 इतकी राहिली आहे, अशी माहिती आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन (फाडा) यांनी दिली आहे.
फाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी म्हटले आहे, की मे 2019 च्या तुलनेत मे 2022 मधील विक्री पाहिल्यास प्रवासी वाहने आणि टॅक्टरांची कामगिरी सकारात्मक राहिली आहे. परंतु दुचाकी, तीनचाकी व वाणिज्य वाहनांच्या विक्रीत सुधारणात्मक स्थिती निर्माण होण्यास अजूनही वाहन क्षेत्राला प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे गुलाटी यांनी यावेळी नमूद केले आहे.